परभणीतील दंगल शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेस व एमआयएमनेच घडविली; भाजपचा आरोप

नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता.20) परभणी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तुफान दगडफेक झाली. या घटनेवर पहिल्यांदाच भाजपने आपले मौन सोडले आहे.
Parbhani BJP President Allege that City Riots were Preplanned
Parbhani BJP President Allege that City Riots were Preplanned

परभणी : नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध करीत शुक्रवारी (ता.20) परभणी शहरात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तुफान दगडफेक झाली. या घटनेवर पहिल्यांदाच भाजपने आपले मौन सोडले आहे. ही घटना नियोजन पूर्वक होती. शिवसेनेसह दोन्ही कॉग्रेस व एमआयएम या पक्षांनीची ही दंगल घडविली असा आरोप भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी सोमवारी (ता.23) केला.

नागरीकत्व सुधारणा कायद्याची माहिती देण्यासाठी भाजपच्या महानगर शाखेच्यावतीने सोमवारी (ता.23) पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस महानगराध्यक्ष आनंद भरोसे, संजय शेळके, संजय रिझवाणी, मोहन कुलकर्णी, दिनेश नरवाडकर, नितीन वट्टमवार, प्रमोद वाकोडकर, मधुकर गव्हाणे, सुनिल देशमुख, श्री. सांगळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आनंद भरोसे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याची माहिती दिली. 

ते म्हणाले, ''हा कायदा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. त्यामुळे त्याचा विरोध करणे चुकीचे आहे. हा कायदा जुनाच आहे. नागरीकत्व हिसकावून घेण्यासाठी नव्हे तर नागरीकत्व देण्यासाठी हा कायदा आमलात आणला आहे. परंतू शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व एमआयएम या  पक्षांनी जाणिवपूर्वक हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे राण उठविले आहे. परंतू हे चुकीचे आहे. परभणीत मोर्चानंतर झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. या मोर्चाचे राजकीय भांडवल केले जात आहे. केवळ मुस्लिम समाजाच्या एकगट्टा मतावर डोळा ठेवून हा प्रकार केला जात आहे.'' परभणीतील दगडफेक व दंगल घडविणे हा त्यांचा पूर्वनियोजित कट होता असे सांगत या लोकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

मंगळवार पासून स्वाक्षरी मोहिम

नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने मंगळवारपासून स्वाक्षरी मोहिम हाती घेतली जाणार आहे. शहरातील महाविद्यालयासह इतर महत्वाच्या नऊ ठिकाणी ही या मोहिमेसाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत अशी माहिती आनंद भरोसे यांनी दिली. केंद्रशासनाने हा कायदा केल्याने परभणी भाजप महानगर शाखेच्यावतीने अभिनंदनाचा ठराव आपण केंद्र शासनाकडे पाठविला असल्याचे ही  त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com