Congress Melava in Igatpuri
Congress Melava in Igatpuri

आमदार शिवसेनेत गेल्याने फरक नाही; इगतपुरीत काँग्रेस मेळाव्यात आवाज

''कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी पक्षत्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्या एकट्याच गेल्यात. कार्यकर्ते गेले नसल्याने काहीही फरक पडत नाही. आजची प्रचंड गर्दी कॉंग्रेस विरोधकांना इशारा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचाच आमदार निवडून येईल,'' असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी केला.

घोटी : ''कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी पक्षत्याग करुन शिवसेनेत प्रवेश केला. मात्र त्या एकट्याच गेल्यात. कार्यकर्ते गेले नसल्याने काहीही फरक पडत नाही. आजची प्रचंड गर्दी कॉंग्रेस विरोधकांना इशारा आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचाच आमदार निवडून येईल,'' असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे यांनी केला. 

येथील कॉंग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्‍वभूमीवर आज मतदारसंघातील सर्वात मोठे गाव घोटी येथे पक्षाचा मेळावा झाला. त्याला मिळालेला प्रतिसाद प्रचंड म्हणावा असाच होता. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांत उत्साह होता. ''पक्षांतर केलेल्यांचे भविष्यात काय होते हे सांगण्याची गरज नाही. हा मतदारसंघ अनेक वर्षे कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. आमदार गेल्या मात्र त्यांच्यासोबत कोणीच गेलेले नाही. आजची गर्दी कॉंग्रेस विरोधकांना इशारा आहे. आगामी निवडणुकीत इगतपुरीमध्ये कॉंग्रेसचाच आमदार होईल असा ठाम विश्‍वास आहे,'' असे यावेळी संपत सकाळे यांनी सांगितले.  

ते म्हणाले, ''आमदार गवितांचा पराभव करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठीच हा मेळावा आहे. कॉंग्रेस नेस्तनाबूत झाली असे चित्र रंगविले जात होते. मात्र आजची उपस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पदाधिकारी चमत्कार घडवू शकतात. गेले ते एकटेच गेले आहेत. कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी पक्षातच आहेत. विकास नाही म्हणून कॉंग्रेस सोडली की भ्रष्टाचार केला म्हणून पळावे लागले हे जनतेला माहित आहे. निर्मला गवितांना आदिवासी विकास मंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. इगतपुरी तालुका खड्डयात घातला, आता राज्य खड्यात घालवणार का? हे शिवसेनेने ठरवावे. युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, कामगार, महिला सबलीकरणावर भर देत कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागावे.''

यावेळी जिल्हा अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, पक्षाच्या प्रवक्‍त्या डॉ. हेमलता पाटील, भास्कर गुंजाळ, मधुकर लांडे, हिरामण खोसकर, कचरू पाटील शिंदे, जनार्दन माळी, जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाडे, सभापती सुनंदा भोईर, बाळासाहेब कुकडे, आकाश छाजेड, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, बाजार समितीचे सभापती रामदास चव्हाण, संचालक वसंत मुसळे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com