राज्यात भाजप सत्तेत नकोच , काँग्रेस नेत्यांची खलबते 

..
Prithviraj_Chavan_Ashok_Chavan_Balasaheb_Thorat
Prithviraj_Chavan_Ashok_Chavan_Balasaheb_Thorat

मुंबई:  राज्यातील सत्तेत भाजप नसावे अशी काँग्रेसची भूमिका आहे. त्यासाठी काय करता येईल याबाबत राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची खलबते सुरु आहेत . 


राज्यात  भाजपाला बाजूला ठेवून सरकार बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  काँग्रेस पक्षाचे नेते देखील आता सक्रिय  झाल्याचे चित्र दिसत आहे .  मुंबईमध्ये बुधवारी दुपारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली .


या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,विजय  वडेट्टीवार ,यशोमती ठाकूर , विश्वजीत कदम, नितीन राऊत, हुसेन दलवाई ,अमित देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. 

काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक अचानक ठरली . या बैठकीसाठी अशोक चव्हाण नांदेड येथून तर विजय वडेट्टीवार चंद्रपूर येथून  दाखल झाले . नितीन राऊत देखील नागपूरहून या बैठकीसाठी दाखल झाले.

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या आमदारांची काय भूमिका आहे याबाबत सर्व नेत्यांनी एकमेकांना माहिती दिली असल्याचे समजते . राज्यातील नेत्यांशी  चर्चा करून काँग्रेसचे नेते हायकमांडकडे प्रस्ताव पाठवण्याचे तयारीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com