कॉंग्रेस नेत्यांना तरुणाईचं मन वळवता आले नाही: अमरिश पटेल

amrishbhai patel.
amrishbhai patel.

धुळे : सलग तीन वर्षे कमी पाऊस पडला तरी शिरपूर पॅटर्नमुळे एकही पाण्याच्या टॅंकरची गरज भासली नाही. मी सव्वा दोनशे बंधारे  बांधले. या वर्षी पावसाच्या पाण्याचे प्रमाण चांगले होते.  त्यांमुळे सर्वच बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही . अशा या शिरपूर पॅटर्नचे सर्वेसर्वा तथा माजी शिक्षण मंत्री अमरिश-पटेल यांची सकाळ माध्यम समूहाच्या यिनबझच्या "महाराष्ट्र दौऱ्यात" संदीप काळे यांनी प्रश्न-उत्तर स्वरूपात घेतलेली ही विशेष मुलाखत. 

*अनेक राजकीय नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करत आहेत या मागचं कारण काय? 


सत्ता असणाऱ्या पक्षाकडे आयारामांची भरती होते. सत्ता नसणाऱ्या पक्षात गयारामांची गळती लागते. असं आजवरच्या इतिहासात नेहमीच घडत आले आहे. यात काही नविन नाही. भविष्यात भाजपकडे 10-15 वर्षे सत्ता कायम राहील असे काही नेत्यानां वाटत आहे. त्याचसोबत आपण निवडून येणार नाही अशी असुरक्षितता असणाऱ्या नेत्यांनी भाजपचा मार्ग निवडला आहे असे मला वाटते.

*तुम्ही भाजपमध्ये जाणार आशी चर्चा होती?


ही चर्चा खोटी आहे, मला भाजपकडून कोणतीही ऑफर आली नाही आणि माझी भाजपमध्ये जाण्याची इच्छाही नाही.

*एकाच पक्षाकडे संपुर्ण सत्ता असेल तर ते धोक्याचं आहे का?


सत्ताधाऱ्यांना आपल्या चुकीची जाणिव करुन देण्यासाठी विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे.

*देशात आर्थिक मंदी असतानाही भाजपला यश का मिळालं?

कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना तरुणाईची मने त्यांच्याकडे वळविता आली नाही तर दुसरीकडे भाजपने तरुणाईला प्राधान्य दिले. त्यामुळे ही तरुणाई भाजपकडे वळली परिणामी भाजपला अनपेक्षित यश मिळाले.

*तरुणाई भाजप पक्षाकडे वळण्याच नेमकं कारण काय?

60 वर्षे झाली तरी तेचं उमेदवार निवडणूक लढवतात. नव्या उमेदवाराला किंबहुना तरुण उमेदवाराला कॉंग्रेस मध्ये संधी उपलब्ध नसल्यामुळे हा तरुण संधी देणाऱ्या भाजपकडे वळला.

*पहिली निवडणूक तुम्ही 1990 मध्ये लढवली, तेव्हापासून आतापर्यंत काय बदल जाणवतो?

महाराष्ट्राची जनता विचारी आहे. जो विकासाचे काम करेल, त्याला ती निवडून देत होती असा माझा अनुभव होता. परंतू, आता हे चित्र बदललं आहे. जनता महत्त्वकांक्षी झाली आहे, जातीयवादाचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार आजचा तरुण ज्याच्या हाती काम नाही तर तो नेता बनून  पैसे कमविण्याचा विचार करत आहे. परिणामी आमच्या सारखे जे जुने नेते आहेत त्यांना अडसर वाटत आहे. कदाचित यामुळेचं पक्षांतर होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com