विजय वडेट्टीवार खात्याबद्दल खुश की नाराज?

विरोधात असताना विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. कॉंग्रेसच्या कोअर कमेटीतही ते होते. त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले. विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्प असल्याने ऊर्जा खाते मिळावे यासाठी ते इच्छुक होते.
Vijay Vadettiwar Unhappy About Portfolio
Vijay Vadettiwar Unhappy About Portfolio

नागपूर : मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपावरून महाआघाडीत सहभागी असलेल्या सर्वच पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजी दिसू लागली आहे. कॉंग्रेसचे माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हेसुद्धा नाराज असल्याचे कळते. त्यांचा समावेश कॅबिनेट मंत्री म्हणून झाला असला तरी दुय्यम खाती दिल्याने ते फारसे खुश नाहीत. खातेवाटप विषयावर आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, तुम्हाला जे लिहायचे ते लिहा, असे ते बोलले त्यामुळे ते फारसे खुश नसल्याचे स्पष्ट होते.

मूळचे शिवसैनिक असलेले वडेट्टीवार चवथ्यांदा विधानसभेत निवडून आले आहे. युतीच्या काळात ते वनविकास महामंडळाचे अध्यक्ष होते. याच काळाते ते विधान परिषदेचे सदस्य होते. नारायण राणे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. राणे यांनी सेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबतच वडेट्टीवार हेसुद्धा कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसतर्फे चिमूरमधून ते निवडून आले होते. त्यांना राज्यमंत्री म्हणून बढती मिळाली होती. 

त्यावेळी त्यांच्याकडे ऊर्जा, सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण व वन राज्यमंत्री ही खाती होती. मोदी लाटेतही ते ब्रम्हपुरी येथून निवडूण आले होते. राधाकृष्ण विखे पाटील भाजपात गेल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले होते. सहाजिकच त्यांना चांगल्या खात्याची अपेक्षा होती. त्यामुळे वडेट्टीवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

ऊर्जा खात्यासाठी होते इच्छुक

विरोधात असताना विजय वडेट्टीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. कॉंग्रेसच्या कोअर कमेटीतही ते होते. त्यामुळे पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान देण्यात आले. विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत प्रकल्प असल्याने ऊर्जा खाते मिळावे यासाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांना मदत व पुनर्वसन, ओबीसी ही खाते देण्यात आली. ती फारशी महत्त्वाची समजली जात नाही. या उलट त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहे. यावर त्यांनी बोलणेही टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com