काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याची चूक करू नये : संजय निरुपम

एका बाजूला काँग्रेस शिवसेनेबरोबर जाण्यासाठी बैठका घेत आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांच्यासारखे काही नेते काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याला विरोध दर्शवत आहेत
Sanjay Nirupam Not Happy with Congress Going with Shivsena
Sanjay Nirupam Not Happy with Congress Going with Shivsena

मुंबई : एकीकडे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार बनविण्याच्या हालचाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सुरु असतानाच मुंबईतले काँग्रेस नेते व माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरूपम यांनी मात्र शिवसेनेला आपला असलेला विरोध व्यक्त करणे सुरुच ठेवले आहे. 

निरुपम यांनी एक ट्वीट केले असून त्यांनी त्यात पक्ष नेतृत्वाला इशारा दिला आहे. 'काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाबरोबर जाऊन काँग्रेसने चूक केली होती. तेव्हा काँग्रेसने जो मार खाल्ला त्यातून काँग्रेस आजही सावरलेली नाही. महाराष्ट्रात आम्ही हीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाची जागा घेणे म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस गाडून टाकण्यासारखे आहे. काँग्रेस अध्यक्ष दबावाखाली न येतील तर पक्षाच्या दृष्टीने ते चांगले राहील,' असे निरुपम यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. ॉ

दरम्यान, काँग्रेसची आज बैठक होत असून या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात के सी वेणूगोपाल,मल्लिकार्जुन खरगे,विजय वडेट्टीवार,नितीन राऊत,अशोक चव्हाण,नसीम खान बैठकीसाठी दाखल झाले आहेत. काँग्रेस वॉर रूम मध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com