कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन 

हैदराबाद : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी (वय 77) यांचे आज पहाटे येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसापासून उपचार सुरु होते. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांना न्युमोनिया त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु होते मात्र ते अयशस्वी ठरले. रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 रोजी तेलंगण येथील माडगूळ गावात झाला होता.

एक धडाडीचे कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली. देशात जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा त्यांनी कॉंग्रेस विरोधात बंड पुकारले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि जनता दलात गेले. ते जनता दलाचे सरचिटणीस होते. मात्र पुढे ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. 

माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या कार्यकाळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. तर मनमोहन सिंग सरकारच्या काळात त्यांच्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com