congress leader digvijasingh criticizes jyotiraditya on mp politics | Sarkarnama

दिग्विजयसिंह चिडले : ज्योतिरादित्य यांचे वाभाडे काढले.. काॅंग्रेसने ही आॅफर शिंदेंना दिली होती..

अतुले मेहेरे
गुरुवार, 26 मार्च 2020

मध्य प्रदेशमधील काॅंग्रेसचे कमलनाथ सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर काॅंग्रसचे नेते दिग्विजयसिंग यांनी खुले पत्र लिहिले आहे. 

भोपाळ : काॅंग्रेसचे नेते जोतिरादित्य शिंदे यांना केंद्रीय मंत्री व्हायचे होते. मध्यप्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेची आॅफर धुडकावून ज्योतिरादित्य यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि मध्य प्रदेशच्या जनतेशी विश्वासघात केला, असे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले. मंगळवारी खुले पत्र लिहून त्यांनी सिंधीयांवर हे आरोप केले.

पीटीआय ने त्यांच्या जारी केलेल्या खुल्या पत्रात दिग्विजय म्हणाले, काॅंग्रेसने त्यांना राज्यसभेसाठी कधीही मनाई केली नव्हती. ज्या दोन जागा निवडायच्या होत्या, तेवढे आमदार काॅंग्रेसकडे निश्चितच होते. याशिवाय मध्य प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्षपदही त्यांना देऊ केले होते. पण त्यांची केंद्रीय मंत्री बनन्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या कृतीमुळे मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार पडले. त्यांनी जनतेशी बेईमानी केली आहे. जनतेच्या अपेक्षांना त्यांनी केंद्रीय मंत्रीपदासाठी लिलाव केले आहे. आपल्या घराला लिलाव करणे माणिक कृती नाही. मध्य प्रदेशच्या जनतेसाठी ही दुःखद घटना आहे. याची भरपाई त्यांना भविष्यात करावीच लागेल. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशचाच नाही, तर काॅंग्रेसच्या विचारधारेचा आणि काॅंग्रेसला माननाऱ्या तमाम जनतेचाही विश्वासघात केला आहे. काॅंग्रेसमध्ये मानमरातब मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वथा चुकीचे आहे. 

कोरोनाचे संकट असताना आरोग्यमंत्री तुलसीराम पळाला
ज्या काळात भाजप देशाला तुकड्यांमध्ये तोडायला निघाली होती. नेमक त्यावेळीच त्यांनी भाजप प्रवेश केला आणि कमलनाथ सरकार पाडले.  देशासोबतही ही गद्दारी आहे. त्यांचा कार्यकर्ता तुलसीराम सिलावतला त्यांना मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनवायचे होते. पण तेव्हा कमलनाथ यांनी विरोध केला आणि तुलसीरामला आरोग्य मंत्री बनवले. कमलनाथ यांचा तो निर्णय अगदी योग्य होता. कारण उपमुख्यमंत्री म्हणून कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्याची कुवत तुलसीरामची नव्हती आणि कोरोनाचे संकट आले असतानाच शिंदे यांच्यासोबत तुलसीरामही त्यांच्यासोबत आरोग्यमंत्र्याची जबाबदीरी झटकून पळाला. बरे झाले की तो गेला. नाही तर संकटाशी दोन हात करण्याचे सोडून त्याने मध्य प्रदेशचा सत्यानाशच केला असता, असे दिग्विजय सिंह म्हणाले. 

'पाॅवर पाॅलीटीक्स'पासून दूर
सन २००३ मध्ये जेव्हा मध्यप्रदेशात काॅंग्रेसची सरकार पडली. तेव्हापासून मी 'पाॅवर पाॅलीटीक्स'पासून दूर आहे. सत्ता गेली म्हणून काॅंग्रेस सोडून पळालो नाही. तर पक्ष बाधणीसाठी काम करतोय. प्रलोभने सगळ्यांनाच देण्यात आली. पण काॅंग्रेसने आजतागायत सर्व देऊनही ते बेईमान झाले आणि पाॅवर पाॅलीटीक्स केले. याची शिक्षा जनताच त्यांना देईल. मी आणि माझ्यासारखे कार्यकर्ते तळागाळात जाऊन काम करु आणि पक्षाला नवी उभारी देऊ, असा विश्वास दिग्विजय सिंह यांनी खुल्या पत्रात व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख