Congress To Focus on North Maharashtra | Sarkarnama

काँग्रेस नेत्यांचे आता उत्तर महाराष्ट्र लक्ष्य 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच मोठी संपर्क मोहीम राबविली जाणार आहे. यासंद्रभात उद्या (ता.20) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार चेल्ला वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठक होणार आहे. 

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आता उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच मोठी संपर्क मोहीम राबविली जाणार आहे. यासंद्रभात उद्या (ता.20) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार चेल्ला वामसी चांद रेड्डी यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय बैठक होणार आहे. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेतला जाणार आहे. बूथ कमिट्या, जनसंपर्क अभियान, पक्षातर्फे आयोजित प्रशिक्षण शिबिरे व वेगवेगळे कार्यक्रम याबाबत आढावा घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनीती बैठकीत आखण्यात येणार असल्याची माहिती पानगव्हाणे यांनी दिली आहे. शुक्रवारी युवक काँग्रेस, एनएसयूआय व महिला काँग्रेस यांची बैठक होणार आहे. 

या बैठकीनंतर लगेचच जिल्हानिहाय समस्यांवर लक्ष केंद्रीत करुन संपर्क मोहीम होईल. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महापालिकेची असह्य करवाढ, रखडलेली विकासकामे, पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे झालेले दुर्लक्ष, काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील विकासकामे आणि सध्याच्या काळातील रखडलेली कामे यांची तुलना, आदिवासी भागातील विकासकामांकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले जाणार आहे. 

बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी के. सी. पाडवी, सहप्रभारी डी. जी. पाटील, आमदार निर्मला गावित, डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख