कॉंग्रेस नेते रशीद शेख म्हणाले....आमदार मौलाना मुफ्तींना पाठीशी घालणे गैर

पोलिस व प्रशासन आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना पाठिशी घालत आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठीच असल्याचे होम क्वारंटाइनचे नाटक आहे असा आरोप काँग्रेसचे माजी आमदार रशिद शेख यांनी केला आहे
Congress Ex Mla Rashid Shaikh Demands Action against Maulana Mufti
Congress Ex Mla Rashid Shaikh Demands Action against Maulana Mufti

मालेगाव : ''पोलिस व प्रशासन आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना पाठिशी घालत आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात जामीन मिळविण्यासाठीच असल्याचे होम क्वारंटाइनचे नाटक आहे. महेशनगर पाठोपाठ मच्छीबाजार व फार्मसी कॉलेज परिसरात झालेल्या दोन्ही गोळीबारांचीही पोलिसांनी कसून चौकशी करावी. माहिती लपविणाऱ्या व गैरकृत्य करणाऱ्या लोकप्रतिनिधीला पाठीशी घालणे गैर आहे," असे प्रतिपादन काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी येथे केले.

हजारखोली भागातील संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. शेख म्हणाले,  ''दिल्ली, आग्रा येथे जमियतचे कार्यालय तसेच अन्य कामासाठी गेलेल्या आमदार मौलाना मुफ्ती यांनी तेथून परतल्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनातही भाग घेतला होता. मालेगावी परतल्यानंतर त्यांनी सभा घेतली. आयुक्त, अपर अधिक्षक, उपअधिक्षक आदींसह अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. सामुहिक नमाजपठण केले. सामान्य रुग्णालयात गोंधळ घातला. ही वस्तुस्थिती पाहता प्रशासन सर्व आमदार, सभेला उपस्थित नागरीक, संबंधित अधिकारी यासह कोणाकोणाची वैद्यकीय तपासणी करणार असा प्रश्न आहे,''

गोळीबाराची चौकशी करा

''मच्छीबाजार व फार्मसी कॉलेज परिसरात झालेला गोळीबार सुपारी देऊन झाला होता की काय याची चौकशी झाली पाहिजे. सामान्य रुग्णालयातील गुन्ह्यात आमदार मौलाना मुफ्ती यांच्यावर शासकीय कामात अडथळा व दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयित राजरोस फिरत आहेत. पोलिसांनी समान न्यायाने कारवाई करायला हवी.''अशीही मागणी त्यांनी केली. 

''कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. मालेगावच्या हितासाठी आणि या आपत्तीला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्‍यक वस्तू वा औषधांच्या दुकानांत औषध खरेदी करण्यासाठी गेल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दी टाळावी,'' असे आवाहनही श्री. शेख यांनी नागीरकांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com