`दक्षिण-पश्‍चिम नागपूर'मध्ये कॉंग्रेसला नको `सरप्राइज' उमेदवार?

दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा `सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे.
`दक्षिण-पश्‍चिम नागपूर'मध्ये कॉंग्रेसला नको `सरप्राइज' उमेदवार?

नागपूर - दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आम्हाला बाहेरचा `सरप्राइज' उमेदवार नको असल्याची मागणी मतदारसंघातील कॉंग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच विदर्भाचे निवडणूक प्रभारी मुकुल वासनिक यांच्याकडे केली आहे.

कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी कालच "मुख्यमंत्र्यांना "चॅलेंज' देण्यासाठी एखादा तगडा उमेदवार शोधण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याची गरज आहे.' असे म्हटले होते. त्यामुळे येथे बाहेरचा "सरप्राइज' उमेदवार देण्याची भिती नगरसेवकांना आहे. त्यामुळे मुकुल वासनिकांना पत्र पाठवून ही मागणी करण्यात आली आहे. वासनिक यांना केलेल्या तक्रारीत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचाही समावेश आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते सुमारे 30 वर्षांपासून याच मतदारसंघात कार्य करीत आहोत. बाहेरचा उमेदवार लादल्यास सर्वांचे मनोबल खचेल व आत्मविश्‍वाससुद्धा कमी होईल. त्यामुळे उमेदवार देताना याच मतदासंघातील कार्यकर्त्यांचा विचार करावा, अशी मागणीही केली आहे. 

प्रभाग क्रमांक 16 मधील भक्ती पन्नासे, अरविंद गणवीर, विजय मांजरीकर, गीता यादव, प्रभाग 17 मधील नगरसेवक हर्षला साबळे, प्रशांत ढाकणे, शेखर पितळमुंडे, कल्पना सातपुते, प्रभाग 35 मधील पंकज थोरात, नंदा देशमुख, सधन यादव, प्रभाग 36 मधील किशोर उमाठे, प्रसन्न जिचकार, रेखा बाराहाते, अर्चना बडोले, प्रभाग 37 मधील विकास ठाकरे, प्रसन्न बोरकर, राधिका नासरे, प्रज्ञा पन्नासे, प्रभाग 38 मधील उज्ज्वला बनकर यांच्या स्वाक्षरीनिशी मुकुल वासनिक यांच्याकडे तक्रार केली आहे.

विशेष म्हणजे या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांची इच्छा पश्‍चिम नागपूरमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. नरेंद्र जिचकार किंवा माजी आमदार आशीष देशमुख यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून कॉंग्रेस वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com