Congress does not want MIM, how can we accept NCP, questions Prakash Ambedkar | Sarkarnama

कॉंग्रेसला एमआयएम नको, तर आम्हाला `राष्ट्रवादी' कशी चालणार? : अॅड. प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर समविचारी पक्ष म्हणून कॉंग्रेसशी आघाडी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र, कॉंग्रेसने भारिप बहुजन महासंघाशी आघाडी करताना एमआयएम नको असे म्हटले आहे. त्यांना एमआयएम नको तर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस कशी चालणार? असा टोला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला लगावला. 

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर समविचारी पक्ष म्हणून कॉंग्रेसशी आघाडी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मात्र, कॉंग्रेसने भारिप बहुजन महासंघाशी आघाडी करताना एमआयएम नको असे म्हटले आहे. त्यांना एमआयएम नको तर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस कशी चालणार? असा टोला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला लगावला. 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पाच राज्यांतील निकालांनी भाजप केंद्रीत राजकारणाचा अस्त झाल्याचेही आंबेडकर म्हणाले. 
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भारिपचे जिल्हा प्रवक्ते डॉ. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, ज्ञानेश्‍वर सुलताने, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, प्रभा शिरसाट, वंदना वासनिक, शंकरराव इंगळे, जिल्हा परिषद सदस्य शोभा शेळके, महानगराध्यक्ष सिमांत तायडे, प्रसन्नजीत गवई आदींची उपस्थिती होती. 

यावेळी ऍड. आंबेडकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेचा कौल पाच राज्यांत भाजपविरोधी राहिला. या निवडणुकीने पुन्हा प्रादेशिक पक्षांना बळ दिले आहे. त्यामुळे आता भाजप विरोधात उभी झालेली महाआघाडी टिकेल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे आता महाआघाडी करून पंतप्रधानपदासाठी इच्छुक असलेल्यांना नव्याने मांडणी करावी लागणार आहे. 

कॉंग्रेससोबतच्या आघाडीबाबत बोलताना त्यांना एमआयएम नको तर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेस कशी चालणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मिळालेल्या यशाचे स्वागत करीत ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधान राहिल की नाही या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे सांगितले. मुस्लिमांची संख्या कमी असलेल्या राज्यात भाजपचा पराभव म्हणजे हिंदूंनीच भाजपा नाकारले असल्याचे ते म्हणाले. नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासन नियुक्तीचा कोणताही नियम नाही. त्यामुळे नागपूरला जो न्याय तोच अकोल्यालाही मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख