खातेवाटपात नाराजी नाट्‌य..!, कृषी व ग्रामविकासच्या मागणीने कॉंग्रेसचा नवा खोडा

खातेवाटपात नाराजी नाट्‌य..!, कृषी व ग्रामविकासच्या मागणीने कॉंग्रेसचा नवा खोडा

जनाधार जोडता येईल असे विभाग कॉंग्रेसकडे असावेत असा सुर या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी लावला. त्यामुळे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रभारी मल्लिकार्जून खर्गे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या कृषि हे शिवसेनेकडे तर ग्रामविकास राष्ट्रवादीकडे आहे. सत्तावाटपात मंत्रिपदाचा पेच सुटलेला असला तरी खातेवाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचे हे चिन्ह आहे.

मुंबई : महाविकास आघाडीचे परिपूर्ण मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर आता खातेवाटपावरून नाराजीनाट्य रंगण्याचे संकेत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसमध्ये खातेवाटपाचे सूत्र ठरलेले असले तरी कॉंग्रेसने आज अचानक कृषी अथवा ग्रामविकास यापैकी एखादे खाते मिळावे अशी इच्छा व्यक्‍त केली आहे. कॉंग्रेसच्या या नव्या मागणीने खातेवाटपात खोडा निर्माण होण्याचे संकेत आहेत. 

या प्रकारामुळे खातेवाटपाचा तिढा लगेचच सुटण्याचे चिन्ह नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. आज कॉंग्रेसचे सर्व मंत्री दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व राहूल गांधी यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते. मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर या सर्व मंत्र्यांनी दिल्लीत एकत्रित धाव घेतली. कॉंग्रेसकडे असलेल्या खात्याबाबत पक्षश्रेष्ठीं सोबत चर्चा झाली. त्यावेळी जनतेशी थेट जोडणारे विभाग कॉंग्रेसकडे आले नसल्याची नाराजी पक्षश्रेष्ठींनी व्यक्‍त केल्याचे समजते. 

जनाधार जोडता येईल असे विभाग कॉंग्रेसकडे असावेत असा सुर या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी लावला. त्यामुळे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व प्रभारी मल्लिकार्जून खर्गे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या कृषि हे शिवसेनेकडे तर ग्रामविकास राष्ट्रवादीकडे आहे. सत्तावाटपात मंत्रिपदाचा पेच सुटलेला असला तरी खातेवाटपाचा तिढा मात्र कायम असल्याचे हे चिन्ह आहे. 

महाविकास आघाडी सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे. या निर्णयाच्या जाहीरातीमधे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे छायाचित्र छापण्यात येईल. त्यामुळे या निर्णयात कॉंग्रेसची छाप दिसणार नाही. अशी नाराजी काही कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे, कृषि खाते कॉंग्रेसकडे असावे. अन्यथा ग्रामविकास खाते तरी मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेस नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार कॉंग्रेस नेते उध्दव ठाकरे यांच्याकडे कृषि अथवा ग्रामविकास विभागासाठी आग्रह धरतील असे कॉंग्रेसच्या नेत्यांची स्पष्ट केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com