मोदी म्हणाले दिवा लावा...काँग्रेसच्या राहुल दिवेंनी चक्क 'दिवे'लावले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊला वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले. अनेकांना हा उथळ इव्हेंट वाटला. त्याविषयी नापसंती दर्शवायची म्हणून येथील काँग्रेसचे कल्पक अन् नावातच 'दिवे' असलेल्या नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रभागातील मोठा चौक जनरेटर आणून फ्लडलाईटने उजळवला
Congress Corporator in Nashik Flooded Chown in CIty.
Congress Corporator in Nashik Flooded Chown in CIty.

नाशिक  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री नऊला वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले. अनेकांना हा उथळ इव्हेंट वाटला. त्याविषयी नापसंती दर्शवायची म्हणून येथील काँग्रेसचे कल्पक अन् नावातच 'दिवे' असलेल्या नगरसेवक राहुल दिवे यांनी प्रभागातील मोठा चौक जनरेटर आणून फ्लडलाईटने उजळवला. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाची आधीच खिल्ली उडवली होती. त्याबाबत राहुल दिले म्हणाले, "असले इव्हेंट करण्यापेक्षा गंभीर होऊन कोरोनाचा मुकाबला करायचा असेल तर वैद्यकीय सुविधा, साधने उपलब्ध केले पाहिजेत. त्याबाबत केंद्र सरकारने काहीही केलेले नाही. समाजाला गोंधळात टाकून, भावनिक खेळ सुरु आहे. याचा राग येतो. आमच्या नाशिक शहरात अनेक समस्या आहेत. त्यावर उपाययोजना हवी आहे,'' 

ते पुढे म्हणाले, ''आपल्या सर्वांना माहिती आहे की, आज देशावर, राज्यावर किती मोठे कोरोना सारखा विषाणू वायरस चा आजार पसरला आहे. परंतु, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आपल्या ला कधी टाळ्या वाजवायला सांगत आहे तर कधी घरातील लाईट बंद करून ब्लॅक आऊट करून दिवा लावायला सांगत आहे. तरी मोदीजी आपण आम्हास टाळ्या वाजवायला सांगितले आम्ही वाजवल्या. परंतु, २२ मार्चचा कोरोना ग्रस्त रुग्णांचा आकडा हा ३०० च्या खाली होता आणि आज ५ एप्रिल रोजी चा कोरोना ग्रस्त रुग्णांचा आकडा हा तीन हजारांच्या जवळपास जाऊन पोहचलाय आणि अशा गंभीर परिस्थितीत राज्याला आणि देशाला तुम्ही ब्लॅक आऊट करून दिवे लावायला सांगत आहात ह्याची आम्हाला एक भारतीय नागरिक म्हणून लाज वाटते,''

ते पुढे म्हणाले, ''नरेंद्र मोदी ह्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यासाठी काय केले, निधी किती उपलब्द करून दिला याबाबत बोलावे हे अपेक्षित होत परंतु देशात नागरिक गोरगरीब लोक जीव मुठीत घेऊन जगत आहे तर नरेंद्र मोदी यांना प्रत्येक आठवड्यात एक नवीन इव्हेंट सुचतोय. म्हणून आम्ही मोदी यांच्या ह्या दिवे लावण्याच्या इव्हेंट मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. दिवे लावून कोरोना जाईल ह्या अंधश्रद्धेचा आम्ही निषेध करतोय आणि आमच्या घराचे लाईट तर आम्ही चालू ठेवलेत. परंतु सर्व ठिकाणी मोठ्या प्रकाशाचे हॅलोजन लावले आहेत,''

या निषेध आंदोलनात काँग्रेस नेते नगरसेवक राहुल दिवे नगरसेविका आशा तडवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल जोंधळे रफिक तडवी संजय गायकवाड गौरव केदारे संजय लोखंडे राहुल देवरे अनिकेत जाधव सचिन पगारे सुभाष अहिरे व इतर उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com