Congress Claim on Pankaj Bhubal's Nandgaon Constituency | Sarkarnama

पंकज भुजबळांच्या नांदगाव मतदारसंघावर काँग्रेसने केला दावा

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघ काँग्रेसकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी तसा ठराव करुन श्रेष्ठींना पाठविला.

नाशिक : आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघ काँग्रेसकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी तसा ठराव करुन श्रेष्ठींना पाठविला. दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपात काहींची सोय तर काहींची गैरसोय कशी होईल या दृष्टीने आडाखे मांडले जात आहेत. त्यामुळे हा दावा कितपत गांभीर्याने घेतला जाईल याविषयी दोन्ही पक्षांतील नेत्यांना शंका वाटते आहे. 

विधानसभेच्या सांभाव्य जागावाटपावर चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. त्याआधीच या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला. जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात हा ठराव मंजूर झाला. तो पक्षश्रेष्टींनां पाठविण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी सांगितले. पक्षाच्या या भूमिकेला बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला. आम्हाला गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निर्णय लादतात अशी नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. 

जिल्हाध्यक्ष पांगव्हाणे यांच्यासमोरच काँग्रेसच्या हक्काच्या जागेवर आघाडीचा धर्म पाळताना यापूर्वीच्या निर्णयावर फेरविचार व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार नांदगाव मतदारसंघ काँग्रेसचा हक्काचा आहे. तो पुन्हा काँग्रेसला मिळावा असा ठराव झाला. 'आगामी निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारकडे नेहरू- गांधी कुटुंबावर टीका करण्यापलीकडे काहीही मुद्दे नाहीत. पाच वर्षे केवळ देश व जनतेची फसवणुक केल्याने मतदार त्यांना यंदा त्याची जागा दाखवतील. काँग्रेसने साठ वर्षांत काय केले? असा प्रश्न भाजप कडून विचारला जातो. आम्ही भाजपनेच पाच वर्षात काय केले? हे विचारणार आहोत.' असे ठरावाद्वारे सांगण्यात आले. 

यावेळी रमेश कांहडोळे जिल्हा परिषध सदस्या अश्विनी आहेर, तालुका निरीक्षक उत्तमराव ठोंबरे, भारत टाकेकर, मुनावर सुलताना, युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख