कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज सगळ्यात महाग

कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज सगळ्या महाग असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.
congress charges five thounsand rupees to candidature form
congress charges five thounsand rupees to candidature form

औरंगाबादः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. पंरतु अद्याप आघाडीची अधिकृत घोषणा झालेली नाही. कॉंग्रेसने सध्या ११५ वार्डात लढण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत कॉंग्रेसकडून १४५ इच्छकांनी अर्ज खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे कॉंग्रेसचा उमेदवारी अर्ज सगळ्या महाग असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवाराकडून अर्ज आणि पक्षनिधी पोटी पाच हजार तर एससी, एसटी प्रवर्गातील इच्छूकांकडून अडीच हजार रुपये घेतले जात आहेत.

महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. भाजप, एमआयएम, कॉंग्रेस या पक्षांनी इच्छुकांना उमेदवारी अर्ज वाटप सुरू केले असून सगळ्याच पक्षांकडे उमेदवारी साठी उड्या पडल्या आहेत. कॉंग्रेसकडे इच्छुकांची गर्दी कमी असली तरी त्यांची जिल्ह्यातील ताकद, महापालिकेतील संख्याबळ पाहता दीडशे इच्छुकांचा आकडा हा देखील समाधानकारक मानला जात आहे.

विशेष म्हणजे कॉंग्रेसकडून महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्यांकडून अर्जासाठी तब्बल पाच ते अडीच हजार रुपये एवढे शुल्क घेतले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपला पक्षनिधी वाढवण्यावर जोर दिल्याचे यावरून स्पष्ट होते. इच्छुक उमेदवारांकडून शुल्क आकारले जात असल्याबद्दल कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील याला दुजोरा दिला.

प्रदेश कमिटीने दर ठरवून दिले..
महापालिका निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छकांकडून पाच ते अडीच हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचा आहे. त्यांनी ठरवून दिलेली रक्कमच आम्ही अर्जासोबत स्वीकारत आहोत. कमिटीने खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार रुपये, तर एससी आणि एसटीसाठी अडीच हजार रुपये इतके शुल्क घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानूसार १४५ इच्छूक उमेदवारांकडून रोख, धनादेश, डीडी स्वरूपात शुल्क घेतले जात आहे. त्याची रितसर पावती देखील संबंधितांना दिली जात असल्याचे नामदेव पवार यांनी `सरकारनामा'शी बोलतांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com