Congress BJP comes together in Jalgaon ZP president election | Sarkarnama

भाजपच्या साथीला काँग्रेस अन राष्ट्रवादी, शिवसेनेचा घरोबा : जळगाव जिल्हापरिषदेत काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा अध्यक्ष, उपाध्यक्ष

कैलास शिंदे - सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 मार्च 2017

कैलास शिंदे - सरकारनामा ब्युरो
जळगाव - जिल्हापरिषदेत काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे अध्यक्षपदी उज्वला मच्छिंद्र पाटील व उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन या भाजप उमेदवारांची निवड झाली. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी आघाडी केली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. राष्टवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर होते.

कैलास शिंदे - सरकारनामा ब्युरो
जळगाव - जिल्हापरिषदेत काँग्रेसच्या चार सदस्यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळे अध्यक्षपदी उज्वला मच्छिंद्र पाटील व उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन या भाजप उमेदवारांची निवड झाली. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी आघाडी केली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. राष्टवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर होते.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना भाजपच्या 33 सदस्यांसह काँग्रेसचे 4 अशी प्रत्येकी 37 मते मिळाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी-शिवसेनेत आघाडी झाली होती. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री पाटील व उपाध्यक्षपदाचे सेनेचे उमेदवार गोपाळ चौधरी यांना प्रत्येकी 27 मतेच मिळू शकली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे तीन सदस्य गैरहजर राहिले. तर काँग्रेस सदस्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा देत सेना-राष्ट्रवादीला तोंडघशी पाडले. नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. उज्वला पाटील या जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी असून त्या एरंडोल तालुक्‍यातील आडगाव-कासोदा गटातून निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्हा परिषदेत भाजप व शिवसेना युतीची सत्त्ता गेल्या पंधरा वर्षापासून होती. निवडणूक वेगवेगळी लढवायची परंतु सत्तेत युती करायची असे सत्तेचे समिकरण दोन्ही पक्षाचे होते. परंतु, यावेळी दोन्ही पक्षानी निवडणूक वेगळी लढविली. परंतु त्यानंतर युती मात्र केली नाही. यावेळी भाजपने स्वबळाचा नारा दिला दिला होता, त्यानुसार त्यानीं तयारीही केली होती, त्यांना 33 जागा मिळाल्या होत्या बहुमतासाठी अवघे एक जागा कमी पडली होती. त्यामुळे भाजपने शिवसेना यावेळी सत्तेत सोबत न घेण्याचा निश्‍चय केला होता.

काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे 16 सदस्य निवडून आले आहेत. या पक्षाचे सदस्य फोडण्याचे आडाखे आखले होते. त्यानुंसार काँग्रेसचे दोन सदस्य त्यांच्या गळाला लागले होते. त्यामुळे बहुमत मिळणार हे निश्‍चित झाले होते. मात्र, तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सदस्य फोडण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्याना त्यांना यश आले आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य फुटले. त्यामुळे भाजपच्या सत्तेचे गणित अधिकच जुळले, तर दुसरीकडे शिवसेनेने सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडतोड केली. काँग्रेसचे फुटलेले सदस्य येतील त्यामुळे 34ची संख्या होवून बहुमत मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती.

मात्र, ऐन निवडणुकीत भाजपची खेळी यशस्वी ठरली. काँग्रेसच्या दोन जागा तर आल्याच नाहीत, उलट उर्वरीत दोनही भाजपला मिळाले. त्यामुळे चारही जणांनी भाजपला मतदान केले. त्यामुळे त्यांची संख्या 37 झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य गैरहजर राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीला त्यांच्या सदस्यांचीही पूर्ण मतेही मिळाली नाहीत, राष्ट्रवादीची तीन मते कमी होवून केवळ 27 मते त्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळाली आहेत.

या निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्यात मात्र नवीन राजकीय समिकरणे जुळली आहेत. काँग्रेसचे नेतृत्व पूर्णपणे फेल गेले आहे. त्यांचे चार सदस्य निवडून आले. परंतु, त्यांना ते सुध्दा सांभाळता आलेले नाहीत. आपल्या नेतृत्वाचा आदेश नाकारून चारही सदस्यांनी भाजपला पाठींबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेंसच्या नेतृत्वाला विचार करण्याची वेळ आली आहे. तर गेल्या पंधरा वर्षापासून जिल्हा परिषदेत परंपरागत असलेली सत्तेची शिवसेना युती मात्र पूर्णपणे संपुष्टात आली आहे. शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवून नवीन घरोबा केला आहे. त्यामुळे आगामी काळात नवीन राजकीय खेळीकडे लक्ष असणार हे निश्‍चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख