एक आमदार हवा असेल पिंपरीची जागा मागा; काँग्रेसच्या इच्छुकाची विनंती 

पिंपरी-चिंचवडच्या तीनपैकी पिंपरी राखीव या विधानसभा मतदारसंघाची कॉंग्रेसने मागणी केलीच नसून त्यासाठी आग्रहही धरल्याने तेथून मुलाखती दिलेल्या राष्ट्रवादीच्या आठ इच्छूकांच्या पोटात गोळा आला आहे.दुसरीकडे तेथील कॉंग्रेस इच्छूकांच्या आशा,मात्र बळावल्या आहेत. शहरातील चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात भाजप ताकदवान असून तेथे त्यांचे आमदारही असल्याने पिंपरीची जागा मागा, अशी मागणीवजा विनंती पिंपरीच्या एका इच्छुकाने आज त्यासाठीच्या मुलाखतीत केली.
एक आमदार हवा असेल पिंपरीची जागा मागा; काँग्रेसच्या इच्छुकाची विनंती 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या तीनपैकी पिंपरी राखीव या विधानसभा मतदारसंघाची कॉंग्रेसने मागणी केलीच नसून त्यासाठी आग्रहही धरल्याने तेथून मुलाखती दिलेल्या राष्ट्रवादीच्या आठ इच्छूकांच्या पोटात गोळा आला आहे.दुसरीकडे तेथील कॉंग्रेस इच्छूकांच्या आशा,मात्र बळावल्या आहेत. शहरातील चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघात भाजप ताकदवान असून तेथे त्यांचे आमदारही असल्याने पिंपरीची जागा मागा, अशी मागणीवजा विनंती  पिंपरीच्या एका इच्छुकाने आज त्यासाठीच्या मुलाखतीत केली.

पिंपरी-चिंचवडमधील तीन जागांसाठी काँग्रेसने आज पुण्यातील पक्ष कार्यालयात (कॉंग्रेस भवन) मुलाखती घेतल्या. त्यावेळी पक्षाला एक आमदार हवा असे, तर पिंपरीची जागा मागा,अशी मागणी पिंपरीतील एका इच्छुकाने केली. दोन दिवसांपूर्वीही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात पुण्यात आले असताना त्यांच्याकडेही ही मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर शंभर टक्के या मागणीचा विचार करू,एवढेच नाही,तर त्याचा पाठपुरावाही करू, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याची माहिती एका जागेसाठी आग्रह धरलेले शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज 'सरकारनामा'ला दिली. शहरातील सर्वाधिक २१ झोपडपट्या पिंपरीत असून तेथे पक्षाचा परंपरांगत मतदार आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात ही जागा पक्षाला अधिक सोईची ठरेल, असे या मतदारसंघातून इच्छुक म्हणून मुलाखत दिलेले सुंदर कांबळे यांनीही सांगितले.

दरम्यान,दोन्ही कॉंग्रेसकडून युतीतील दोन्ही पक्षांत होत असलेले आऊटगोईंग, लोकसभेला आघाडीची झालेली वाताहत पाहता विधानसभेला ती टिकविण्याशिवाय दोन्ही कॉंग्रेसकडे पर्याय नसल्याचे आज मुलाखत दिलेल्या पिंपरीतील एका कॉंग्रेस इच्छूकाने सांगितले.त्यामुळे 2009 ला आघाडी असताना जशी चिंचवडची जागा पक्षाला सोडण्यात आली होती,तशी यावेळी मागणी केलेली पिंपरीची जागा सोडावी लागेल असे ते म्हणाले. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी (ता. २८) पुण्यातच पिंपरीतील जागेसाठी मुलाखती दिलेल्या राष्ट्रवादीच्या आठजणांच्या पोटात गोळा आला आहे. ही जागा कॉंग्रेसकडे गेली, तर केलेली मोठी तयारी व आतापर्यंत खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जाण्याची भीती त्यातील काहींना सतावू लागली आहे. पिंपरी मतदारसंघातूनच दोन्ही कॉंग्रेसकडून (राष्ट्रवादी आठ,तर कॉंग्रेस चार)सर्वाधिक इच्छुक आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com