हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, पाडवी काँग्रेसचे नवे कार्याध्यक्ष? ५ जुलैला नियुक्त्या जाहीर होणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे नांव निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेस संघटनेला बळकटी आणण्यासाठी कार्याध्यक्षांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत.
हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, पाडवी काँग्रेसचे नवे कार्याध्यक्ष? ५ जुलैला नियुक्त्या जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब थोरात यांचे नांव निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेस संघटनेला बळकटी आणण्यासाठी कार्याध्यक्षांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उद्या भिवंडीत येत असून मावळते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त व्हायला नको म्हणून या नियुक्त्या ५ जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या दारूण पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी हा राजीनामा स्वीकारला असून कुठल्याही क्षणी बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे. 

दरम्यान, हर्षवर्धन पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या नियुक्त्या जाहीर करण्यासाठी आणखी दोन दिवस जाऊ शकतात. उद्या (ता. ४) राहुल गांधी भिवंडीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातल्या खटल्यासाठी न्यायालयात येणार आहेत. अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारल्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पक्षाध्यक्षांसमोर निदर्शने होऊ नयेत, या साठी सर्व नियुक्त्या ५ जुलैला जाहीर करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com