जागावाटप व्हायच्या आधीच काॅंग्रेसकडून जतची उमेदवारी विक्रम सावंत यांना जाहीर

जागावाटप व्हायच्या आधीच काॅंग्रेसकडून जतची उमेदवारी विक्रम सावंत यांना जाहीर

जत : काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील आघाडीतील जागावाटप ठऱायच्या आधीच काॅंग्रेसने जत विधानसभा मतदारसंघावर आज आपला दावा सांगितला. काॅंग्रेसची जनसंघर्ष यात्रा जतमध्ये पोचल्यानंतर स्थानिक राजकारण निघालेच. खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचा निकाल जाहीर केला.

काॅंग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी भाषणात सर्वात आधी या विषयाला वाचा फोडली. ``आघाडीतून जागा मिळो अगर न मिळो. पण विक्रम सावंत याना विधानसभेच्या रिगणात उतरवणारच. तीच री अशोक चव्हाण यांनी ओढत आघाडीतून जतची जागा कॉग्रेकडेच घेणार आणि विक्रम सावंत यांनी तयारी करावी असा आदेश दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचा पत्ता कट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपा त्रास देतोय तरीही आम्ही पाठींबा देतो या आमदार अनिल बाबर यांच्या वक्तव्याचा धागा पकडून हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजपकडे व्हिजन आहे, विकासाची दृष्टी आहे म्हणून लोक जात नाहीत. तर ते नाईलाजाने जात आहेत. भाजपचा खरा चेहरा उघडा पडला आहे. त्यामुळे गेलेले पुन्हा स्वगृही येतील.

जत तालुक्‍यात धनगर समाजाची संख्या जास्त असल्याने आजच्या संघर्ष यात्रेत कॉंग्रेसच्या नेत्यांनी या समाजाला फोकस केले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम व बसवराज पाटील यांनी धनगर समाजाच्या आरक्षणावरून सरकार टीकेची झोड उठवली व समाज कॉग्रेसच्या पाठीशी असल्याचा दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com