राधाकृष्ण विखे पाटील मुलासाठी कमळाच्या प्रचारात; तरीही बनले काॅंग्रेसचे स्टार प्रचारक

राधाकृष्ण विखे पाटील मुलासाठी कमळाच्या प्रचारात; तरीही बनले काॅंग्रेसचे स्टार प्रचारक

पुणे : प्रदेश काॅंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपले 40 प्रचारक जाहीर केले. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे. विखे पाटील हे आपला मुलगा व भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात मग्न असल्याने त्यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नी अमिता चव्हाण यांचेही नाव या यादीत समाविष्ट करून घेतले आहे. ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर यांचाही समावेश यात आहे. क्रिकेटपटून अझरूद्दीन देखील आता काॅंग्रेसचा स्टार प्रचारक बनला आहे. विखे पाटील हे जाहीरपणे मुलाच्या प्रचारात नसले तरी त्यांनी त्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे काॅंग्रेस अजूनही विखे पाटलांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. 

ही यादी पुढीलप्रमाणे 

1) श्रीमती सोनिया गांधी
२) श्री राहुल गांधी
3) डॉ. मनमोहन सिंग
4) श्रीमती प्रियंका गांधी वड्रा
5) श्री मल्लिकार्जुन खर्गे
6) श्री गुलाम नबी आझाद
7) श्री ज्योतिरादित्य शिंदे
8) श्री अशोक चव्हाण
9) श्री राधाकृष्ण विखे-पाटील
10) श्री सुशीलकुमार शिंदे
11) श्री पृथ्वीराज चव्हाण
12) श्री बाळासाहेब थोरात
13) श्री मुकुल वासनिक
14) श्री के.सी. वेणुगोपाल
15) श्री विजय वडेट्टिवार
16) श्री अशोक (भाई) जगताप
17) श्री विलास मुत्तेमवार
18) श्री राजीव सातव
19) श्री मिलिंद देवरा
20) श्री संजय निरुपम
21) श्रीमती नागमा मोराजी
22) श्री हर्षवर्धन पाटील
23) श्री कुमार केतकर
24) श्री शिवराज पाटील
25) श्री कृपाशंकर सिंह
26) डॉ. नितीन राऊत
27) श्री वसंत पुरके
28) श्री चंद्रकांत हंडोरे
29) श्री भालचंद्र मुणगेकर
30) श्री हुसेन दलवाई
31) श्री नसीम खान
32) श्री मोहम्मद अझरुद्दीन
33) श्री मुजफ्फर हुसेन
34) श्री इम्रान प्रतापगडी
35) श्री विश्वजित कदम
36)  श्री सचिन सावंत
37) श्री अमर राजुरकर
38) श्री हरिभाऊ राठोड
39)  श्री रामहरी रुपनवर
40) श्रीमती अमिता चव्हाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com