काँग्रेसची पहिली यादी -  कँटोन्मेंटमध्ये रमेश बागवे, भोरला संग्राम थोपटे तर पुरंदरमधून संजय जगताप 

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने आज सायंकाळी आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीनुसार पुण्यातून कँटोन्मेंट मतदारसंघातून माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदर मधून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Ramesh Bagve - Sanjay Jagtap - Sangram Thopt
Ramesh Bagve - Sanjay Jagtap - Sangram Thopt

पुणे :राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने आज सायंकाळी आपली पहिली यादी जाहीर केली. या यादीनुसार पुण्यातून कँटोन्मेंट मतदारसंघातून माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदर मधून संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भोकर) यांचेही नाव पहिल्या यादीत आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे संगमनेरमधून निवडणूक लढवणार आहेत. अमित देशमुख (लातूर शहर), प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य), यांचीही नावे जाहीर करण्यात आली आहेत. 

काँग्रेसने आज ५१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. पळूस कडेगाव मतदारसंघातून डाॅ. विश्वजित कदम यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. काँग्रेस छाननी समितीच्या बैठकीनंतर २० सप्टेंबरला यादी जाहीर होईल असे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आधी सांगितले होते. पहिल्या यादीत के. सी. पाडवी -अक्कलकुवा, हर्षवर्धन सपकाळ - बुलडाणा, शिरीश चौधरी - रावेर, 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com