पंढरपुरात राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार जाहीर

राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी पंढरपूर विधानसभा मतदार संघात मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालकेंच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा.शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर करुन राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.
Bharat Bhalke - Shivaji Kalunge
Bharat Bhalke - Shivaji Kalunge

पंढरपूर : राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी पंढरपूर विधानसभा मतदार संघात मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार भारत भालकेंच्या विरोधात काँग्रेसने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा.शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर करुन राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

बुधवारी  (ता.2) रात्री काँग्रेसने राज्यातील 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदार संघातून  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक प्रा. शिवाजी काळुंगे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला.  पंढरपूरची जागा ही आघाडीत काँग्रेसकडे होती. दरम्यान काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यापूर्वी आमदार भालके हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. परंतु, भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करुन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली आहे.

त्यातच काल काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पंढरपूरमधून  मंगळवेढा येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. शिवाजी काळुंगे यांचे नांव जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भात प्रा.शिवाजी काळुंगे यांना विचारले असता ते म्हणाले, "कालच्या यादीत काँग्रेसने माझे पंढरपूरसाठी नाव जाहीर केले आहे. मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे.  त्यामुळे मला काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. एबी फार्म देखील मला मिळाला असून मी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,"एकाच मतदार संघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वंतत्र उमेदवार जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com