या तीन अल्पसंख्य नेत्यांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आले जवळ !

देशभरातील अल्पसंख्याक समाजासमोर हा संदेश गेला की या तीन पक्षातील तीन मुस्लिम लोकप्रतिनिधी आपली बाजू लावून धरत आहेत. त्याचा एकत्रित अपेक्षित परिणाम साधला गेला आणि हे तीन पक्ष आणखी जवळ आल्याचे मानले जाते.
या तीन अल्पसंख्य नेत्यांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आले जवळ !

मुंबई : शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी तर कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष, अल्पसंख्याकांना चुचकारणारा असे या दोन पक्षांना संबोधले जाते. या दोन पक्षांची विचारसरणी वेगळी असल्याने सत्ता समीकरणात या दोन पक्षांना एकत्र येण्यासाठी हा अडथळा मानला जात होता. शिवसेनेसोबत गेले तर देशभरातील अल्पसंख्याक समाज दुरावला जाईल, ही भीती कॉंग्रेस पक्षाला होती. ही भीती दूर करून या दोन पक्षातील दरी कमी करण्याचे काम शिवसेनेचे आमदार अब्दूल सत्तार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रवक्‍ते नवाब मलिक, कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई या राज्यातील तीन मुस्लिम लोकप्रतिनिधींनी केले आहे. 

भाजप-शिवसेना युतीने तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने 2019 ची विधानसभा निवडणुक लढवली होती. भाजप विधानसभेत क्रमांक एकच पक्ष ठरला मात्र शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्यास कमी ठरला. त्यातच शिवसेनेने भाजपला मुख्यमंत्री पदाची मागणी करून खिंडीत गाठत कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर संधान बांधण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस पक्ष यास तयार नव्हता. राज्यात भाजपला सत्ता स्थापनेपासून कोणत्याही परिस्थिीतीत दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसने शिवसेनेला पाठींबा दयावा यासाठी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना खुले पत्र लिहिले. 

दलवाई यांनी राज्यातील अल्पसंख्याक समाजाला शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपसारखे नाही हा संदेश दिला. शिवसेना-कॉंग्रेसमधील दरी कमी करताना त्यांनी सामनाच्या कार्यालयास भेट दिली. तसेच दिल्लीत कॉंग्रेस हायकंमाडच्या कानावर शिवसेनेबरोबर जाणे हिताचे असलेले सांगितले. तसेच शिवसेना ही कटटर हिंदुत्वावादी पक्ष असला तरी किमान समान कार्यक्रम तयार करून सरकार स्थापन करावे, यासाठी आग्रह धरला. तसेच सोनिया गांधी यांचे मन वळवले. 

दलवाई यांच्याप्रमाणे मुळचे कॉंग्रेसचे असलेले मात्र शिवसेनेत प्रवेश करून आमदार झालेल्या अब्दूल सत्तार यांनी वेळोवेळी शिवसेना जरी हिंदुत्वावादी पक्ष असला तरीही अल्पसंख्याक समुहाने घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत अल्पसंख्याक समाजाला एक संदेश देण्याचे काम केले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही तिहेरी विण गुंफताना अगदी रणनितीचा भाग म्हणून राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्‍ते नवाब मलिक यांना माध्यमांशी बोलण्याची परवानगी दिली. आघाडीतील चर्चेचे ब्रीफ केवळ नवाब मलिकच माध्यमासमोर करत होते. यामुळे देशभरातील अल्पसंख्याक समाजासमोर हा संदेश गेला की या तीन पक्षातील तीन मुस्लिम लोकप्रतिनिधी आपली बाजू लावून धरत आहेत. त्याचा एकत्रित अपेक्षित परिणाम साधला गेला आणि हे तीन पक्ष आणखी जवळ आल्याचे मानले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com