भविष्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र होणार - सुशीलकुमार शिंदे

भविष्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ येतील आणि एकत्रित होणार असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना सांगितले.
सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे

पुणे - भविष्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस जवळ येतील आणि एकत्रित होणार असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना सांगितले.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सुशीलकुमार शिंदेंच्या भूमिकेचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जल्लोष करीत स्वागत केले. 

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस भविष्यात एकत्र येऊ शकतात, हे सांगताना शिंदे म्हणाले, की आता कॉंग्रेस थकली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसही थकली आहे. कधी तरी एका झाडाखाली आम्ही वाढलो आहोत. एका आईच्या मांडीवर वाढलो आहोत. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व घेऊन आम्ही पुढे आलेलो लोक आहोत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी कॉंग्रेस भविष्यात जवळ येणार आहेत. एकत्र होणार आहेत, याची मी ग्वाही देतो.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com