काँग्रेसचे अनुपस्थित आमदार येडियुरप्पांच्या मुलाच्या ताब्यात?

कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावाची वेळ जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता काँग्रेसने आमच्या दोन आमदारांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाने डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचे अनुपस्थित आमदार येडियुरप्पांच्या मुलाच्या ताब्यात?

बंगळूर - कर्नाटकमध्ये विश्वासदर्शक ठरावाची वेळ जवळ येत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता काँग्रेसने आमच्या दोन आमदारांना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाने डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा पाटील यांना बंगळूरमधील हॉटेल गोल्डन फिंचमध्ये बंधक बनवून ठेवले आहे. या प्रकरणी बंगळूर अतिरिक्त पोलिस आयुक्त सीमानाथ कुमार सिंह आपल्या पथकासह हॉटेलमध्ये पोहचले असून, शोध घेण्यात येत आहे. हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

काँग्रेस नेता व्ही. एस. उग्रप्पा यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे, की भाजप नेते बी. वाय. विजयेंद्र यांनी काँग्रेस आमदाराच्या पत्नीला फोन करून येडियुरप्पा यांना मतदान करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना 15 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com