धरण फुटले कोकणात...कॉंग्रेसचे आंदोलन झाले येवल्यात! 

सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच तिवरे धरण फुटले. तेथील आपत्तीग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीसाठी तसेच निवडणूक होताच शासनाने इंधर दरवाढ केली याचा निषेध करण्यासाठी येवल्यात कॉंग्रेसजन रस्त्यावर उतरले. यावेळी शेतकरी, जनतेच्या समस्यांचा पाढा वाचत त्यांनी घंटानाद आंदोलन केले.
धरण फुटले कोकणात...कॉंग्रेसचे आंदोलन झाले येवल्यात! 

येवला : सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच तिवरे धरण फुटले. तेथील आपत्तीग्रस्तांना न्याय द्यावा या मागणीसाठी तसेच निवडणूक होताच शासनाने इंधर दरवाढ केली याचा निषेध करण्यासाठी येवल्यात कॉंग्रेसजन रस्त्यावर उतरले. यावेळी शेतकरी, जनतेच्या समस्यांचा पाढा वाचत त्यांनी घंटानाद आंदोलन केले. दीर्घकाळानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते सक्रीय झाल्याने कॉंग्रेसच्या घंटानादाने प्रशासनाला जाग येईल किंवा नाही; मात्र कॉंग्रेस कार्यकर्ते जनतेच्या प्रश्‍नावर जागे झाल्याने नागरीकांत या आंदोलनाची चर्चा झाली. 

भ्रष्टाचारामुळे तिवरे धरण फुटल्याची व मुंबईत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. दुष्काळात शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून बी- बियाणे खरेदीचा प्रश्‍न उभा राहिल्याचा आरोप करत तालुका कॉंग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयावर बुधवारी टाळनाद आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 'भाजप सरकारने भूलथापा देत सत्ता काबीज केली. मात्र, इंधर दरवाढ, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप, वाढती महागाई आदींसह अनेक निर्णय धोरणाअभावी निकालात निघाले नाही. तसेच तिवरे धरण दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,' अशी मागणी यावेळी करण्यात आली.  

आंदोलकांनी तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन दिले. या वेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्षा रश्‍मी पालवे, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, अर्जुन कोकाटे, नंदकुमार शिंदे, बळिराम शिंदे, संदीप मोरे, राजेंद्र गणोरे, सुकदेव मढवई, अझहर शहा, शेरू मोमीन, अमोल फरताळे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com