congress agitation petrol hike in nashik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसचे गाजर वाटप 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

नाशिकः केंद्र सरकारने मागील आठवड्यात पाच राज्यांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोलचे भाव करण्याचे गाजर सर्वसामान्य माणसाला दाखवले. कृती मात्र काहीच नाही. त्याविरोधात शनिवारी युवक कॉंग्रेसने पेट्रोल पंपांवर ग्राहकांना गाजर वाटप केले. विशेष म्हणजे भाववाढीने त्रस्त ग्राहकांनीही त्याचे हसतमुखाने स्वागत करीत आनंदाने ही गाजरं खाल्ली. 

सातत्याने होणाऱ्या पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात होणारी राजकीय आंदोलने नवी नाहीत. मात्र पंचवटी परिसरातील पेट्रोल पंपांवर युवक कॉंग्रेसने ग्राहकांना केलेले गाजर वाटप आंदोलन चर्चेचा विषय ठरले. यावेळी इंधन भरण्यास येणाऱ्या नागरीकांचे स्वागत करुन कार्यकर्ते त्यांना गाजर वाटत दरवाढीचा निषेध करीत होते. ग्राहकही त्यांचे हसतमुखाने स्वागत करीत प्रतिसाद देत होती. 

यावेळी अनेकांनी कार्यकर्त्यांनी दिलेली गाजरं खाल्ली. मोदी सरकारने जाहिरातबाजीवर केलेल्या खर्चाने अर्थव्यवस्था कोलमडली, महागाई वाढली. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढत आहे. या विरोधात "मोदी सरकार मुर्दाबाद', "पेट्रोल दरवाढ रद्द करा' आदी घोषणा दिल्या. शहर कॉंग्रेचे अध्यक्ष शरद आहेर, उपाध्यक्ष विजय राऊत, सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, सरचिटणीस सुरेश मारू, पंचवटी महिला कॉंग्रेच्या अध्यक्ष कल्पना पांडे, उद्धव पवार, स्वप्नील पाटील, रोहन कातकाडे 
यांसह पदाधिकारी उपस्थित होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख