congress | Sarkarnama

नवी मुंबईत कॉंग्रेसच "किंगमेकर'?

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा
बुधवार, 10 मे 2017

नवी मुंबई : महापौर निवडणुकीस अद्यापि पाच महिन्याचा कालावधी बाकी असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने गणेश नाइकांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी शिवसेनेतील काही घटकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेसचे नगरसेवकांचे संख्याबळ निर्णायक ठरणार असल्याने महापौर निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्‍यता आहे. 

नवी मुंबई : महापौर निवडणुकीस अद्यापि पाच महिन्याचा कालावधी बाकी असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पर्यायाने गणेश नाइकांच्या मक्तेदारीला शह देण्यासाठी शिवसेनेतील काही घटकांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्तेच्या सारीपाटात कॉंग्रेसचे नगरसेवकांचे संख्याबळ निर्णायक ठरणार असल्याने महापौर निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका किंगमेकरची ठरण्याची शक्‍यता आहे. 

नगरसेवकांच्या सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक, भाजपाचे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक, कॉंग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक नगरसेवक असे संख्याबळ आहे. नेरूळ, घणसोलीतील एक आणि रबालेतील असे चारही अपक्ष सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला समर्थन देत असल्याने असे काठावरचे बहुमत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. 

शिवसेना-भाजपा-कॉंग्रेस एकत्रित आले तरी नगरसेवकांचे संख्याबळ होते. महापौरपदाच्या उमेदवारीकरीता बेलापूर, शिरवणे, तुर्भेसह अन्य भागातील मातब्बरांची वाढती महत्त्वाकांक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकरीता डोकेदुखी बनणार आहे. त्यातच बेलापुरातील एका नगरसेवकाने थेट शरद पवारांची भेट घेऊन आपली इच्छा जाहीर केल्याने राष्ट्रवादीतील नगरसेवक आता बोनकोडेला डावलून खाडीपलिकडे गाड्या दामटू लागल्याची खमंग चर्चा महापालिका मुख्यालयात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाशीतील एका नाराज नगरसेविकेने भाजपाच्या बेलापुरमधील आमदार मंदा म्हात्रेंची भेट घेत प्रभागातील विकासकामांविषयी निवेदन सादर केल्याने वाशीतील संबंधितांवर बोनकोडेचा राजकीय धाक राहीला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सुधारकर सोनवणे हे अपक्ष नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्याने महापौर झाले असले तरी एक माजी महापौर सोनवणेंच्या केबिनमध्ये ढवळाढवळ करत असल्याने सोनवणेंची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यातच करावेतील गणपतशेठ तांडेल मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा महापौरांनी सत्कार केल्यानंतर महापौरांच्या भाजपाच्या वाढत्या सलगीचीही नवी मुंबईत चर्चा सुरू झाली आहे. 

ऐरोली मतदारसंघात भाजपाला चांगला चेहरा नाही. पालिका निवडणुकीनंतर वैभव नाईक भाजपाच्या कार्यक्रमात सक्रिय नसल्याने त्यांना पुन्हा भाजपा विधानसभेचे तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा व रिपाइंची युती पाहता सुधाकर सोनवणे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-रिपाइं युतीचे ऐरोलीतील उमेदवार असण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात येत आहे. सुधाकर सोनवणे व त्यांच्या नगरसेविका पत्नी रंजना सोनवणे ही दोन मते शिवसेना-भाजपा-कॉंग्रेसला मिळाल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव शक्‍य असल्याने शिवसेनेतील घटक कामाला लागले असून त्यांना ठाण्यातील नेतेमंडळींचेही मार्गदर्शन मिळत आहे. 

कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या मोबदल्यात त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपमहापौरपद व एका विषय समितीचे सभापतिपद दिले आहे. कॉंग्रेसने शिवसेना-भाजपा युतीला समर्थन दिले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसला फारसे टेन्शन नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापौरपदाकरता जेमतेम ते नगरसेवकांचे संख्याबळ कमी असल्याने उपमहापौरपद व विषय समितीच्या बदल्यात तो पाठिंबा मिळणार असल्याने कॉंग्रेसबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस निर्धास्त आहे. उपमहापौरपदावरून कॉंग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. गोठीवलीचे रमाकांत म्हात्रे आणि वाशीतील दशरथ भगत आपल्या पत्नीला उपमहापौर बनविण्याकरिता आग्रही आहेत. रमाकांत म्हात्रे हे नवी मुंबईचे माजी उपमहापौर असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांशी त्यांची जवळीक आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना रमाकांत म्हात्रेंचा वर्षा बंगल्यावर चांगली उठबस होती. दशरथ भगत हे नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष असून त्यांच्याच घरात तीन नगरसेवक असून वाशी व ऐरोलीतील दोन नगरसेवक दशरथ भगत समर्थक मानले जातात. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाराज नगरसेवकांची मोट बांधून कॉंग्रेसला आपल्याकडे वळवून महापौर पदावर कब्जा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या मातब्बरांनी हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसचे नगरसेवकांची मोट बांधून आपल्याकडे वळविणाऱ्यांना महापौरपद मिळविणे शक्‍य असल्याचे स्पष्ट झाल्याने महापौरपदाच्या घोडेबाजारात कॉंग्रेसी नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झाले आहे.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख