congress | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

पनवेलमध्ये आघाडीचा निर्णय स्थानिक कॉंग्रेस नेत्यांवर

संदीप खांडगे-पाटील : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाबरोबर आघाडी करायची अथवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची हा निर्णय प्रदेश कॉंग्रेसने सर्वस्वी स्थानिक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर व स्थानिक नेत्यांवर सोपविला असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते महादेव शेलार यांनी दिली. 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्थानिक कार्यक्षेत्रात असलेली पक्षाची ताकद आणि जनाधार याबाबत स्थानिक नेतेमंडळींना आणि पदाधिकाऱ्यांनाच माहिती असल्याने प्रदेश कार्यकारिणीने पनवेल निवडणुकीबाबत कोणाशी आघाडी करायची अथवा स्वबळावर लढायचे याबाबत तेच निर्णय घेतील अशी माहितीही शेलार यांनी दिली. 

स्थानिकांवर निवडणुकीचा निर्णय प्रदेश कार्यकारिणीने सोपविला असल्यामुळे कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत आणि पनवेल शहर अध्यक्ष के.सी.पाटील यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे. भक्तिकुमार दवे हे कॉंग्रेसचे जुने व अभ्यासू नेतृत्व असल्याने या त्रिमूर्तीवर कॉंग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी असेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख