congress | Sarkarnama

पंचायत समित्यांत कॉंग्रेसला माफक यश 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विदर्भात केवळ अमरावती जिल्हा परिषदेत विजय मिळविणाऱ्या कॉंग्रेसने 18 पंचायत समित्या काबीज करून विदर्भात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

नागपूर :  जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये विदर्भात केवळ अमरावती जिल्हा परिषदेत विजय मिळविणाऱ्या कॉंग्रेसने 18 पंचायत समित्या काबीज करून विदर्भात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. केवळ अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ग्रेसला 
विजय मिळाला. या स्थितीतही अमरावतीसह गडचिरोली व यवतमाळमध्ये प्रत्येक 5 पंचायत समित्या व चंद्रपूर जिल्ह्यात 4 पंचायत समित्यांमध्ये कॉंग्रेसने सत्ता
काबीज केली आहे. 
चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. तरीही चंद्रपूरमध्ये भाजपला पूर्ण पंचायत समित्यांवर विजय मिळविता आला नाही. भाजपला या दोनजिल्ह्यातच आपला वरचष्मा कायम ठेवता आला. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भाजपला दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

शिवसेनेला केवळ यवतमाळ जिल्ह्यात करिष्मा दाखविता आला आहे. या जिल्ह्यात 6 पंचायत समित्या सेनेने पटकाविल्या परंतु चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यात
एकही पंचायत समितीवर सेनेचा भगवा फडकला नाही. अमरावतीत एकच पंचायत समिती सेनेला काबीज करता आली. 

जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची पंचायत समितीच्या निवडणुकीत कामगिरी सुमारच राहिली. अमरावती व यवतमाळमध्ये प्रत्येकी एक व गडचिरोली जिल्ह्यात 2 पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश मिळाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख