आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे कोणी राहायला तयार नाही, आठवलेंची टीका 

आज कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे कोणी राहायला तयार नाही, आठवलेंची टीका 

मुंबई : पूर्वी शिवसेना-भाजपमध्ये कोणी राहायला तयार नव्हते आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये राहायला कोणी तयार नाही अशी टीका केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआयकडून 23 जागांच्या मागणीची यादी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यापैकी 10 जागा देण्यात याव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की शिवसेना आणि भाजपने आम्हाला 10 जागा द्याव्यात. जर युतीत असलेले घटक पक्ष एकत्र आलो तर 240 पर्यॅंत जागा मिळतील. राजे महाराजे आता भाजपमध्ये येऊ लागले आहेत. सर्वानाच तुम्ही घेऊ नका तर त्यातील काही आमच्याकडे पाठवा. आम्ही त्यांना विजयी करून दाखवितो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com