`आमदार थोपटेंमुळेच भोरमध्ये सुळेंना मताधिक्य; शिवतरेंची किंमत काय?`

`आमदार थोपटेंमुळेच भोरमध्ये सुळेंना मताधिक्य; शिवतरेंची किंमत काय?`

नसरापूर : भोर तालुक्‍यात आघाडी धर्माचे पालन न केल्याचा आरोप करत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किंमत मोजावी लागेल असे म्हणणाऱ्यांनी, प्रथम स्वतःची किंमत ओळखावी, असा टोला जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी रणजित शिवतरे यांच्या टीकेला उत्तर देताना लगावला.

लोकसभा निवडणुकीत भोर कॉंग्रेस व आमदार थोपटे यांनी आघाडी धर्माचे पालन न केल्याचा आरोप करत रणजित शिवतरे यांनी याची किंमत विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोजावी लागेल, असा इशारा दिला होता. याचा समाचार कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी घेतला असून शिवतरे यांच्या आरोपांना आम्ही किंमत देत नाही ते काही राष्ट्रवादीचे अध्यक्ष किंवा प्रवक्ते नाहीत. अगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवतरे यांनी हे विधान केलेले आहे. कॉंग्रेसने कायम अघाडी धर्माचे पालन केले आहे व ते निकालात स्पष्टपणे दिसले आहे. उलटपक्षी ज्यांनी काम केल्याचा मोठेपणा केला त्यांच्याच गावातील मतदान भाजपाला गेले कसे, याचे त्यांनी स्पष्टीकरण द्यावे.

भोर, वेल्हे व मुळशी तालुक्‍यात कॉंग्रेसच्या सहभागामुळेच सुळे यांना मताधिक्‍य मिळाले आहे. ज्या ठिकाणी मतदान कमी झाले त्याचे कारण या विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत जनतेची कामे न करता ठेकदारी, दमबाजी, गटातटाचे राजकारणच केले आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी केलेली विकासकामे, सर्वसमान्यांचे सोडवलेले प्रश्न व जमवलेला युवक वर्ग या जोरावरच आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्‍य प्राप्त झाले असून, याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न इतरांनी करू नये, असे आवाळे यांनी म्हटले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com