भडगावात भाजप तालुकाध्यक्ष निवडीत गोंधळ  

काल जळगाव येथे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत राडा झाल्याचे पहावयास मिळाला. त्यानंतर आज भडगावात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गट पडले असल्याचेचित्र आहे. त्यामुळे भाजपात पुन्हा एकदा गोधंळ झाल्याचे पहावयास मिळला आहे
Confussion in Election of Bhadgaon BJP Tehsil President
Confussion in Election of Bhadgaon BJP Tehsil President

भडगाव : काल जळगाव येथे झालेल्या भाजपच्या बैठकीतल्या राड्यानंतर आज भडगावात ही तालुकाध्यक्ष निवडीवरून भाजपात दोन गट पडले असल्याचे चित्र आहे. ९ तारखेला जिल्हास्तरावरून तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक अमोल पाटील यांची निवड घोषित करण्यात आली आहे. तर आज भडगावात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डाॅ.संजीव पाटील यांनी बैठक घेत चुडामण पाटील यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे प्रसिध्द पत्रक काढले आहे. त्यामुळे भाजपात तालुकाध्यक्ष निवडीवरून गोधंळ उडाल्याचे चित्र आहे. दोन्ही गटाकडून आम्हीच तालुकाध्यक्ष म्हणून दावा करण्यात आला आहे. 

काल जळगाव येथे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत राडा झाल्याचे पहावयास मिळाला. त्यानंतर आज भडगावात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गट पडले असल्याचे  चित्र आहे. त्यामुळे भाजपात पुन्हा एकदा गोधंळ झाल्याचे पहावयास मिळला आहे. ९ तारखेला जिल्हास्तरावरून जिल्ह्यातील तालुकाध्यक्षाची घोषणा करण्यात आली. त्यात भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. मात्र आज भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष डाॅ.संजीव पाटील यांनी भडगावात बैठक घेत चुडामण पाटील यांची भडगाव तालुकाध्यक्ष निवड घोषीत केली. चुडामण पाटील यांची ८ तारखेलाच निवड झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. तर अमोल पाटील यांची शहरध्यक्षपदि निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.  

या बैठकीला यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम चौधरी , दगडू गाडे, सुरेश नरवाडे, डॉ प्रमोद पाटील, रोजगार हमीचे अध्यक्ष सुरेश कोंडू परदेशी, दगडू महाजन, विनोद नेरकर, राजू पाटील, पुरूषोत्तम पाटील, रायचंद परदेशी, ज्ञानेश्वर पाटील , एकनाथ पाटील, , धनराज पाटिल, निलेश मालपुरे, किरण राजपूत, नितीन महाजन, किरण शिंपी, कैलास भावसार, धर्मा पवार, भास्कर शिरसाठ, नारायण इंगळे, प्रमोद बापूराव पाटील, मनोहर गिरनार, विठ्ठल पाटील , सुरेश राजपूत, अमोल पाटील महिंदले, स्वप्नील पाटील, परमेश्वर पाटील, मनोज पाटील, गोरख पाटील आंचळगाव, सुदर्शन राजपूत, विनोद पाटील, संदीप पाटील, वडगाव, धर्मराज निकम, संदीप पाटील, संजय माळी आदि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

अमोल पाटलांचेही प्रशिध्दपत्रक

आज दुपारीच अमोल पाटल यांनी तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात प्रसिध्दपत्रक दिले आहे. त्यामुळे त्यांनी त्यात म्हटले आहे की, जिल्हा कोअर कमेटीच्या सहमतीने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ.विजय धांडे यांनी निवड घोषीत केल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या निवडीच्या बातम्या ही यापुर्वी घोषीत झाल्या आहेत. असे असतांना मावळते जिल्हाध्यक्ष डाॅ.संजीव पाटील यांनी आज चुडामण पाटील यांची निवड झाल्याचा दावा केला आहे.  

भाजपात बेबनाव 

काल भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत राडा झाल्याने. तर जिल्हास्तरावरून अमोल पाटील यांची भडगाव तालुकाध्यक्ष निवड घोषीत झाली असतांना भाजपचे मावळते जिल्हाध्यक्ष डाॅ.संजीव पाटील यांनी बैठक घेत चुडामण पाटील यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा दावा केला आहे.त्यामुळे भाजपात निवडीवरून बेबनाव असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. एवढेच नाही तर पक्षाच्या कार्यालय प्रमुखाने तालुकाध्यक्षपदाच अंतिम निवड यादी झालेली नसतांना परस्पर प्रसिध्द पत्रक दिल्याचे डाॅ.संजीव यांनी सांगीतले. दरम्यान सोशल मोडीयावर दोन्ही गटाकडुन तालुकाध्यक्ष निवडीचा दावा केला जात आहे.

भाजपच्या कोअर कमेटीत चुडामण पाटील यांचीच भडगाव तालुकाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र जिल्हा कार्यालयप्रमुखाने यादि अंतिम होण्याआधीच प्रसिध्दस दिली. त्या यादीत घोषीत झालेल् नावापैकी अजुन 3-4 ठीकाणी बदल होणार आहेत.-डाॅ.संजीव  पाटील माजी जिल्हाध्यक्ष भाजप

जळगाव जिल्ह्यतील मंडळ अध्यक्षाच्या निवडी संदर्भात पक्षाची जिल्हा कोआर समितीच्या बैठकीत माझ्या नावावर एकमत करण्यात होऊन भडगाव मंडळ अध्यक्ष पदासाठी (तालुकाध्यक्ष) जळगाव जिल्हा निवडणूक सहाय्यक अधिकारी डॉ. विजय धांडे यांनी माझे नाव घोषित केले आहे. आजच्या भडगाव येथे झालेल्या  अनधिकृत बैठकी बाबत व निवडी बाबत मला सोशल मीडिया वर कळाले. मला ज्ञात असलेल्या पक्षीय धोरणा नुसार व निर्णयावरून माझीच निवड वैध व अधिकृत आहे.-अमोल नाना पाटील  तालुकाध्यक्ष - भाजपा भडगाव

माझी कालच भाजपच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. भडगाव तालुकाध्यक्ष निवडी संदर्भात माहीती घेतो. डाॅ. संजीव पाटील यांच्याशी बोलतो -हरीभाऊ जावळे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भाजप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com