तटकरे घराण्यात नणंद-भावजय सामना रंगणार : आदितींच्या विरोधात रेवतींना उतरविण्याचे संकेत 

तटकरे घराण्यात नणंद-भावजय सामना रंगणार : आदितींच्या विरोधात रेवतींना उतरविण्याचे संकेत 

मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसचे जेष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांच्या कुटुंबात राजकिय धुसफूस थांबण्याचे चिन्ह नसून आगामी विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात नणंद-भावजय असा सामना रंगण्याचे संकेत आहेत.

सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे हे या मतदासंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मात्र मागील पाच वर्षात त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी शिवससेनेशी जवळीक केली आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात छुप्या पध्दतीने त्यांचे बंडदेखील समोर आलेले होते.

स्वत: सुनील तटकरे यांनी 2014 लोकसभेत पराभव झाल्यानंतरही अवधूत यांना हक्काची श्रीवर्धनची जागा सोडून विजयी केले होते. मात्र त्यानंतरही कौंटुंबिक राजकिय स्पर्धा रोखण्यात फारसे यश आले नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीच्या निमित्त बारामतीमध्ये संपूर्ण तटकरे कुटुंबियांना एकत्र बोलावून वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले. मात्र अवधूत तटकरे यांच्या बंधूंनी रोहा नगरपरिषद निवडणूकीत बंड करून शिवसेनेसोबत निवडणूक लढविली होती.

आता सुनील तटकरे हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले असून त्यांच्या जागी त्यांच्या कन्या व जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाच्यावतीने देखील आदिती यांच्या नावालाच सर्वाधिक पसंती असून विद्यमान आमदार अवधूत तटकरे यांचा पत्ता कट होईल असे मानले जाते.

त्यामुळे या मतदारसंघात महिला विरूध्द महिला अशी लढत करण्याची अटकळ शिवसेनेतून बांधली जात आहे. आमदार अवधूत तटकरे यांच्या पत्नी रेवती तटकरे या उच्च न्यायालयात वकिली करत आहेत. त्यांनाच आदिती यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने मैदानात उतरवण्याची रणनिती आखली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या एका मोठ्या घराण्यात आगामी विधासनसभा निवडणुकीत नणंद-भावजय असा सामना रंगण्याचे संकेत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com