मध्य प्रदेशात सोमवारी विश्‍वासदर्शक ठराव ? कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा

मध्य प्रदेशात सोमवारी विश्‍वासदर्शक ठराव ? कमलनाथ सरकारची अग्निपरीक्षा

भोपाळ : मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे युवा नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि त्यापाठोपाठ कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी दिलेले राजीनामे यामुळे बळ मिळालेला भाजप सोमवारी (ता. 16 ) बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान सरकारला देऊ शकतो. विधानसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद नरोत्तम मिश्रा यांनीच याबाबत सूतोवाच केले आहेत. यामुळे 14 महिन्यांपूर्वी निसटता विजय मिळविलेले राज्यातील कमलनाथ सरकार अडचणीत येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राज्यातील सरकार अल्पमतात आले असल्याने 16 तारखेला विधानसभेत विश्‍वास सिद्ध करण्यास सरकारला सांगण्याची विनंती आम्ही राज्यपालांना भेटून करणार आहोत, असे नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले. विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांकडे 22 आमदारांचे राजीनामे आहेत, त्यामुळे आता निर्णय त्यांच्यावर अवलंबून आहे, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कॉंग्रेस सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा करत पुन्हा एकदा सूत्रे स्वीकारण्याची तयारी सुरु केली आहे. आमदारांच्या राजीनाम्यापूर्वी, 228 सदस्यांच्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत कॉंग्रेसकडे 114 सदस्यांचे बळ होते. शिवाय त्यांना बसपच्या दोन, सपच्या एका सदस्याचा आणि चार अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा होता. मात्र, यातीलही काही जण भाजपकडे झुकू शकतात. 

कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे स्वीकारले गेल्यास विधानसभेतील सदस्य संख्या 206 होईल. बहुमतासाठी 104 सदस्यांची आवश्‍यकता असताना कॉंग्रेसकडे स्वत:चे 92 आमदार असतील, तर दुसरीकडे भाजपकडे स्वत:च्या 107 आमदारांचे बळ असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com