combined military action decreases terrorist activities in kashmir | Sarkarnama

सुरक्षा दलांच्या संयुक्त मोहिमेमुळे दहशतवादी कारवायांना पायबंद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे.

नवी दिल्ली ः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला आज शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले आहे. लेथपोरा भागात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) बसवर दहशतवादी हल्ला होऊन त्यात ४० जवान हुतात्मा झाले होते. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठीच्या रणनीतीत बदल केला. आता दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीमच आखली जाते. दहशतवाद्यांचे अड्डे शोधून त्यांना पकडले जात आहे किंवा चकमकीत मारले जात आहे. 

‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित आदिल डरने केलेला हा हल्ला काश्‍मीरमधील ३० वर्षांतील सर्वांत मोठा हल्ला होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाईच्या पद्धतीत बदल केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख