महाविद्यालयांचे फलक मराठीत झळकणार! राज्य सरकारचा निर्णय

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीला काढलेल्या शासन परिपत्रकाच्या आधारे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना उद्देशून पत्रक काढले आहे. त्यानुसार महाविद्यालयांना आता आपले फलक मराठीत लावावे लागणार आहेत
Colleges in State have to display their boards in Marathi
Colleges in State have to display their boards in Marathi

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : राज्यात महाविकास आघाडीचे स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी फाइलवर शेरा मराठीतच लिहिण्याच्या सूचना केल्या होत्या. आता शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व नामफलक मराठी भाषेतूनच लावावेत, यासाठी १५ फेब्रुवारीला शासन निर्णय काढून संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आता सर्व महाविद्यालयांना मराठी भाषेतून फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या संचालकांनी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने १५ फेब्रुवारीला काढलेल्या शासन परिपत्रकाच्या आधारे शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना हे पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे, राज्य शासनाने सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये, तंत्रशिक्षण संचालनालय व कला संचालनालयाच्या आधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था, पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था यांमध्ये मराठी भाषेतून नामफलक लावण्याची सक्ती केली आहे. 

सर्व संचालक, महाविद्यालये, तंत्रनिकेतने, परिसंस्था यांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेशात म्हटले आहे. याबाबत संबंधित संस्था, महाविद्यालयाचे प्राचार्य, सहसंचालक, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण यांनी वैयक्तिक लक्ष देऊन, खात्री करण्याचेही आदेश आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय शिकविणे सक्तीचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यानंतर आता मराठी फलकांच्या अंमलबजावणी बंधनकारक करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील सर्व विद्यापीठे व शिक्षण संस्थांना हा आदेश बंधनकारक करण्यात आला आहे. इंग्रजी भाषेत फलक असेल, तेथे इंग्रजी फलकाबरोबरच मराठीतून फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू झाली आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये आता मराठी पाट्या झळकणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com