जिल्हाधिकारी पांडेंनी जेंव्हा स्वत:च्या कार्यालयालाच केला ५ हजार दंड !

निवडणुक विभागाने आयोजित पत्रकार परिषदेत प्लॉस्टीक कपांतून चहा दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधीत दंड वसूलीचे फर्मान सोडले.
Astikkumar_pande
Astikkumar_pande

बीड : अवैध वाळू उपसा, चारा छावण्यांतील अनियमिता करणाऱ्यांवर लाखोंचा दंड ठोठावणाऱ्या आणि कुठलाही दबावाला न झुगारणाऱ्या जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी आज स्वत:च्या कार्यालयात प्लास्टिक मिश्रीत कपांतून चहा दिल्याने पाच हजार रुपयांच्या दंड वसूलीचे फर्मान सोडले.


जिल्हाधिकारी पांडेय यांनी बीडचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर गोडीने सांगून न ऐकणाऱ्यांना कायद्याचा बडगा काय असतो हे अनेक उदाहरणांतून दाखवून दिले.

वाळू माफियांचे तर त्यांनी कंबरडेच मोडले आहे. चारा छावण्यांतून मलिदा खाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर दंडाच्या कारवाईमुळे यापुढे चारा छावण्या नको अशीच भूमिका घेतली आहे. 

परंतु, सोमवारी त्यांना स्वत:च्या कार्यालयालाच दंड वसूलीचे फर्मान द्यावे लागले. विधानसभा निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणुक विभागाने पत्रकार परिषद घेतली.

जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खुद्द जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे माहिती देत होते. परंतु, पत्रकारांना चहा दिलेला कप प्लास्टिक मिश्रीत असल्याचे एका पत्रकाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यांनीही तत्काळ, याची दखल घेतली आणि चहापानाची व्यवस्था सांभाळणाऱ्याकडून पाच हजारांचा दंड घ्यावा अशा सुचना दिल्या. कायदा सर्वांना समान असातो हे अस्तिक कुमार पांडेय यांनी दाखवून दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com