या जिल्ह्यात कलेक्टर आणि पोलिस अधीक्षक दोघेही डाॅक्टर असल्याचा असाही फायदा!

राज्यात बाधितांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. असे असताना तिन राज्यांच्या सिमेवर असलेला चंद्रपूर जिल्हा या संकटापासून दूर आहे. याचे श्रेय वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेल्या जिल्ह्याच्या या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना दिले जात आहे.
maheswar-reddy-kunal-khemna
maheswar-reddy-kunal-khemna

चंद्रपूर : तेलंगणा आणि छत्तीसगढ यो दोन्ही राज्यांच्या सिमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका सर्वाधिक राहील, अशा शक्‍यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होत्या. परंतु या जिल्ह्याचे दोन्हा प्रमुख अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्‍वर रेड्डी हे दोघेही डॉक्‍टर आहेत. या काळात त्यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं कसब पुरेपूर वापरत कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीत येऊ दिलेल नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांमधील समन्वय, नियोजन आणि अनुभवामुळे जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही, असे म्हटले जाते.

महाराष्ट्रात कोरोनाना हाहा:कार माजवला आहे. येथील प्रशासन एकप्रकारे युद्धाला सामोरे जात असल्याचे चित्र राज्यभर आहे. प्रशासकीय पातळीवर निरनिराळे प्रयोग, प्रयत्न केले जात आहेत. राज्यात बाधितांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. असे असताना तिन राज्यांच्या सिमेवर असलेला चंद्रपूर जिल्हा या संकटापासून दूर आहे. याचे श्रेय वैद्यकीय पार्श्‍वभूमी असलेल्या जिल्ह्याच्या या दोन्ही प्रमुख अधिकाऱ्यांना दिले जात आहे. दोन्ही अधिकारी काटेकोर पद्धतीने नियोजन करीत आहेत. एमबीबीएसचे शिक्षण या कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या कामी येत आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत या लढाईत बाजी मारली आणि जिल्हावासीयांनी दिलासा दिला आहे.

सुमारे तीस लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण नसणे मोठे आव्हान होते. मात्र जिल्हाधिकारी कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस प्रमुख महेश्वर रेड्डी यांनी आपल्या वैद्यकीय शिक्षणाचं कसब या संकटकाळात पुरेपून वापरलं. खेमणार यांनी 2008 मध्ये मुंबईतील केईएम जीएस मेडिकल कॉलेजमधून आपले एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आहे. तर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. महत्त्वाचे म्हणजे हे दोघेही केंद्रीय सेवा परीक्षेत बॅचमेट होते. परीक्षा दिल्यानंतर एकजण `आएएस` तर दुसरा `आयपीएस` झाला.

केंद्र आणि राज्य सरकारकडून दिले जाणारे निर्देश या दोन्हा अधिकाऱ्यांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या बळावर समजून घेणे सोपे जात आहे. जिल्ह्यातील यंत्रणा अहोरात्र कोरोना निर्मूलनासाठी झटत आहेत. त्याला डॉक्‍टरी ज्ञानाची साथ मिळत असल्याने हे सहज साध्य होत आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे आंध्र प्रदेशातील कुर्नुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी. मात्र वैद्यकीय शिक्षणानंतर त्यांचा कल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांकडे वळला. 2011 मध्ये महेश्वर रेड्डी केंद्रीय लोकसेवा परीक्षा पास होऊन आयपीएस झाले.

महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीत लक्षवेधी कामगिरी करत नक्षलविरोधी मोहिमेचे अवघड काम सहजपणे करून दाखविले. आता कोरोना नियंत्रणाच्या कठीण प्रसंगी त्यांच्या डॉक्‍टरी शिक्षणाचा मोठा फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला आहे. जिल्ह्यातील पोलिस दलासह नागरिकांच्या बचावासाठी त्यांचे वैद्यकीय ज्ञान मोलाचे ठरत आहे. संपूर्ण राज्य आणि देश कोरोनाशी मुकाबला करत आहे. मात्र या संकटावर मात करणे नियोजनानेच शक्‍य होणार आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी डॉक्‍टर असल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा चंद्रपूरच्या कोरोना नियंत्रणासाठी झाला आहे. जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसणे या समन्वय आणि अनुभवाची पावती आहे, असे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com