Cogress-NCP's morcha to SBI HQ | Sarkarnama

एसबीआय मुख्यालयावर काँग्रेस- राष्टवादीचा मोर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मार्च 2017


कोट
भाजपने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यावर भट्टाचार्य मॅडम शांत बसल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा येताच भटट्टाचार्य यांनी हरकत घेतली. या विधानाबाबत त्यानी माफ़ी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात हक्काभंग प्रस्ताव आणू. - राधाकृष्ण विखे पाटिल, विरोधी पक्षनेते

मुंबई - शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एसबीआय च्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. सभागृहाचे कामकाज़ संपताच् काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी एसबीआय मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. भट्टाचार्य यांनी माफ़ी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी विधिमंडळाचे कामकाज रोखून धरले आहे. योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासना नंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यातच एसबीआयच्या चेअरमेन अरुंधती भट्टाचार्य यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला. ' शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर पतसंस्थांची आर्थिक शिस्त बिघडेल' या भट्टाचार्य यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट मोर्चा काढला. सभागृहाचे कामकाज संपताच दोन्ही काँग्रेसचे आमदार नरीमन पॉइंट परिसरातील एसबीआयच्या मुख्यालयवर धडकले. भट्टाचार्य यांच्या विधानासह सरकारविरोधी घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी केली.

कोट
भाजपने उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यावर भट्टाचार्य मॅडम शांत बसल्या होत्या. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा येताच भटट्टाचार्य यांनी हरकत घेतली. या विधानाबाबत त्यानी माफ़ी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात हक्काभंग प्रस्ताव आणू.
- राधाकृष्ण विखे पाटिल, विरोधी पक्षनेते

भटट्टाचार्य यांच्या वैयक्तिक विधानाशी सरकारचा काहीही संबंध नाही. घटनेतील तरतुदी नुसार शेतकऱ्यांना कर्जमुक्ति देणे शक्य आहे, याचा अभ्यास त्यांनी करायला हवा होता. मात्र, सभागृहाच्या कामकजात व्यत्यय आणला तरच हक्काभंग आणता येतो, याची माहिती मोर्चा काढणाऱ्या विरोधकांनी घ्यायला हवी.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख