cogress ncp meeting about seats maharastra | Sarkarnama

कॉंग्रेस-एनसीपीला गळतीचं ग्रहण, मात्र जागा वाटपात आघाडी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादीला गळतीचं ग्रहण लागलं असलं तरी जागावाटपात मात्र आघाडी घेतलीय. दोन्ही पक्षांमध्ये मुंबईत पार पडलेल्या बैठकीत 288 पैकी 225 जागांचं वाटप पूर्ण झालंय.

आता केवळ 63 जागांचं वाटप बाकी आहे. यातल्या काही जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचे समजते. 

उद्या दिल्लीत कॉंग्रेसच्या निवड समितीची बैठक आहे. त्यानंतर शिल्लक जागांबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. यात अशोक चव्हाण हे भोकरमधून लढणार आहेत. तर नवापूरमधून ज्येष्ठ नेते स्वरूपसिंह नाईक निवडणूक लढवणार आहेत.

विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आलाय. काही विद्यमान आमदार भाजप-शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांची नावे पहिल्या यादीत घेण्यात आली नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख