संविधान बदलण्याचा प्रयत्न मोदी सरकारने करु नये!

भाजप सरकार व भाजपची मातृसंस्‍था आरएसएसने देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला आहे.
cogress agitation against bjp goverenment in nanded
cogress agitation against bjp goverenment in nanded

नांदेड : भारत देशाचा आत्मा हा संविधान आहे. त्यामुळे संविधानाला बदलण्याचा प्रयत्न भाजप आणि मोदी सरकारने करु नये. देशाच्या संविधानाला धक्का लावाल तर कॉँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिला.

केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजप सरकार व भाजपची मातृसंस्‍था आरएसएसने देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला आहे. न्यायालयामध्ये केंद्र शासनाने वारंवार आरक्षणविरोधात भूमिका घेतली आहे. याच्या निषेधार्थ नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस समितीच्यावतीने सोमवारी (ता. २४) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. त्यावेळी श्री. सावंत बोलत होते.

केंद्रामधील भाजप सरकारने वारंवार राज्‍यघटनेविरोधी भूमिका घेतली आहे. राज्‍यघटनेने आरक्षणाचा दिलेला हक्क हा अबाधित राहिला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची पूर्वीपासून राहिलेली आहे; परंतु या भूमिकेला छेद देत देशातील एससी, एसटी, ओबीसी या संवर्गात येणाऱ्या जाती-जमातींना आरक्षणापासून वंचित ठेवण्याची भूमिका केंद्र शासनाने घेतली आहे.
 
या सर्व बाबींच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांच्यासह काँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, आमदार रावसाहेब अंतापूरकर, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, सभापती अमितसिंह तेहरा, सभापती संजय बेळगे, सुशीला बेटमोगरेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता कळसकर, अनुजा तेहरा, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, शमीम अब्दुल्ला, किशोर भवरे, माजी सभापती मसूद खान, आनंदा गुंडले, सोनाजीराव सरोदे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे गटाचे बापूराव गजभारे, आदी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. त्यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सादर करण्यात आले.

 
कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडला कॉँग्रेसच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. भाजपच्या आरक्षण संदर्भातील धोरणांना कॉँग्रेसचा कायम विरोध राहणार असून त्यासाठी राज्यभरात सर्व ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे.
- अमर राजूरकर, आमदार तथा महानगराध्यक्ष, कॉँग्रेस, नांदेड.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com