मुख्यमंत्र्यांसमोर स्वीय सहाय्यकाचे जोरदार भाषण; सक्रीय राजकारणासाठी अभिमन्यू पवारांना मिळणार पाठबळ

येथे रविवारी (ता. ७) रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवारयांनी मुख्यमंत्र्यांसमोर नेत्यासारखेच जोरदार भाषण करीत लातूरचे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे हे प्रश्न दिलदारपणे ऐकून घेत कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली.
मुख्यमंत्र्यांसमोर स्वीय सहाय्यकाचे जोरदार भाषण; सक्रीय राजकारणासाठी अभिमन्यू पवारांना मिळणार पाठबळ

लातूर : हातात फायली, एखादी डायरी, स्वतःसोबतच मुख्यमंत्र्यांचा मोबाईल घेऊन आलेले निरोप टिपणारे, भाषणाच्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागच्या खुर्चीत बसणारे स्वीय सहायक सर्रास पहायला मिळतात. पण एखादा कार्यकर्ता स्वीय सहाय्यक झाल्यास त्याचा सर्वत्र वावर मात्र वेगळाच असतो. असच काहीसं नातं सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार याचं आहे. 

येथे रविवारी (ता. ७) रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नेत्यासारखेच जोरदार भाषण करीत लातूरचे प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे हे प्रश्न दिलदारपणे ऐकून घेत कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल पवार यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. त्यामुळे पवार यांना लवकरच सक्रीय राजकारणात येण्यासाठी
मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळणार हे आता निश्चित मानले जात आहे.

राज्य शासनाच्या वतीने रविवारी (ता. सात) येथे अटल महाआरोग्य शिबिराचे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व पवार यांनी पुढाकार घेतला होता. सक्रीय राजकारणात येवून पवार यांची विधानसभा निवडणूक लढविण्याची मनिषा लपून राहिलेली नाही. गेल्या काही महिन्यापासून ते लातूर शहर व औसा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी जास्त लक्ष केंद्रीत केल्याचे लातूरकर पाहत आहेत. जिल्हाधिकाऱयासह इतरांकडून विकास कामाचे प्रस्ताव मागवून घेवून ते तातडीने सोडवण्याचे कामही ते करीत आहेत.

महाआरोग्य शिबिर हे त्यांच्यासाठी उपयुक्तच ठरले. गेल्या काही दिवसापासून त्यांनी निलंगेकर यांच्यासोबत जिल्हा पिंजून काढला. त्याचा दृष्य परिणाम शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर जाहिर कार्यक्रमात पवार यांचा सत्कारही केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाषण करण्याची संधी सोडतील ते अभिमन्यू पवार कसले. त्यांनी जोरदार भाषण केले. 

मुख्यमंत्र्यांचे लातूरवर खूप प्रेम आहे. ता. २२ जून १९७० हा मुख्यमंत्र्यांचा जन्म दिवस असला तरी ता. २५ मे २०१७ रोजी त्यांचा येथे पुनरजन्म झाला आहे. त्यामुळे लातूरचे व त्यांचे नाते घट्ट आहे. रेल्वे बोगी कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी लातूरच्या रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे...असे सांगत आता लातूरला उजनी धरणाचे पाणी द्यावे, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री हे राजा असतात. राजाने प्रजेला दिले पाहिजे, असेसांगायलाही ते विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांसमोर त्यांचा स्वीय सहाय्यक जोरदारपणे भाषण करतो हे पहिल्यांदाच पहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com