मुख्यमंत्र्यांची बुधवारपासून महाजनादेश यात्रा; दुसरा टप्पा नंदुरबार येथून

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या नंदुरबार ते सोलापूर या दुसऱ्या टप्प्यास 21 ऑगस्टपासून नंदुरबार येथून प्रारंभ होणार आहे. 11 दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा 14 जिल्ह्यांतून 55 विधानसभा आणि 1839 कि.मी. अंतराचा प्रवास असेल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची बुधवारपासून महाजनादेश यात्रा; दुसरा टप्पा नंदुरबार येथून

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या नंदुरबार ते सोलापूर या दुसऱ्या टप्प्यास 21 ऑगस्टपासून नंदुरबार येथून प्रारंभ होणार आहे. 11 दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा 14 जिल्ह्यांतून 55 विधानसभा आणि 1839 कि.मी. अंतराचा प्रवास असेल, अशी माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस व यात्राप्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. 

सुजितसिंह ठाकूर म्हणाले, "फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्यास 1 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी येथून प्रारंभ झाला. हा टप्पा 9 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे संपणार होता. मात्र राज्यातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे तीन दिवस आधीच महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे, 51 विधानसभा आणि 1339 किलोमीटर अंतराचा प्रवास झाला. पहिल्या टप्प्यात महाजनादेश यात्रेला उत्स्फूर्त व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.''

सर्व ठिकाणी महिला व युवकांची सहभागी संख्या लक्षणीय असल्याचे सांगून ठाकूर म्हणाले, ''विशेष म्हणजे गडचिरोली येथे रात्री मोठी सभा झाली आणि फडणवीस हे गडचिरोलीत रात्रीचा मुक्काम करणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. पूर्व नियोजनानुसार दुसरा टप्पा 17 ऑगस्ट रोजी सुरू होणार होता. मात्र, यात्रेच्या वेळापत्रकात बदल करून हा टप्पा 21 ते 31 ऑगस्ट असणार आहे. नंदुरबार ते सोलापूर या दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रील नंदुरबार, धुळे, जळगाव व नगर, विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर या 14 जिल्ह्यांतील 55 विधानसभा मतदारसंघातून 1839 किलोमीटर अंतराचा प्रवास होणार आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com