CM's Helicopter Given to Bhosla Military School of Nashik for Display | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर 'भोसला'च्या मैदानात कायमस्वरुपी लॅंड 

संपत देवगिरे 
सोमवार, 17 जून 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी असलेले शासकीय हेलीकॉप्टर राज्य शासनाने येथील भोसला सैनिकी शाळेला दिले आहे. काल हे हेलिकाॅप्टर येथे दाखल झाल्यावर शाळेच्या मैदानावर ते कायमस्वरुपी स्थितीत ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी 'एचएएल' कडून नाशिक महापालिकेने वापरात नसलेले मिग लढाऊ विमान दिले आहे. ते विमान शहराच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शीत करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर देखील नाशिकला 'लॅंड' झाले आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्य शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी असलेले शासकीय हेलीकॉप्टर राज्य शासनाने येथील भोसला सैनिकी शाळेला दिले आहे. काल हे हेलिकाॅप्टर येथे दाखल झाल्यावर शाळेच्या मैदानावर ते कायमस्वरुपी स्थितीत ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी 'एचएएल' कडून नाशिक महापालिकेने वापरात नसलेले मिग लढाऊ विमान दिले आहे. ते विमान शहराच्या प्रवेशद्वारावर प्रदर्शीत करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर देखील नाशिकला 'लॅंड' झाले आहे.

राज्य शासनाने येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोसला मिलिटरी स्कूलला रविवारी डॉफीन एएस 365 एन 3 व्हीटी एमजीके हे हेलिकॉप्टर दान केले. विमान चालन संचालनालयाच्या जुहू येथील विमानतळावरील हे शासकीय मालकीचे हेलिकॉप्टर रविवारी (ता. 16) संस्थेकडे सुपूर्द केले. राज्यातील विमान चालन विषय शिकविणाऱ्या शैक्षणिक संस्थेस डॉफीन एएस 365 हेलिकॉप्टर दान देण्याबाबत शासनाने 7 सप्टेंबर 2017 ला निर्णय घेतला होता. त्यानुसार, राज्यातील विमान चालविणाऱ्या संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार पाचपैकी कुठल्या संस्थेला हेलिकॉप्टर दान करायचे याविषयी निर्णय शासनाकडे विचाराधीन होता. 

राज्यातील पाच संस्थांनी हेलिकॉप्टर मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. संस्थेच्या सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर आणि कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनास हेलिकॉप्टरची मागणी केली होती. त्यानुसार रविवारी संस्थेस हे हेलिकॉप्टर प्राप्त झाले. या संदर्भात काही अटी व शर्ती निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार हेलिकॉप्टर उड्डाणासाठी वापरता येणार नाही. त्याचे फ्लाइट रेकॉर्ड विमान चालन संचालनालयाकडेच राहील. हेलिकॉप्टर अथवा त्याचा कुठला भाग विकता येणार नाही. 

संरक्षण विषयाची माहिती करून घेताना लढाऊ विमान, हेलिकॉप्टर हे कायमच विद्यार्थ्यांचे कुतूहल असते. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ते भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संरक्षण विषयाच्या अभ्यासात त्यामुळे मोठी मदत होणार आहे. 
- डॉ. दिलीप बेलगावकर, सहकार्यवाह, भोसला मिलिटरी स्कूल 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख