कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेचा मोह सुटलाय : योगी आदित्यनाथ

''भारतीय जनता पक्षाने सुशासनआणले. सरकारच्या योजना गावागावात नेल्या. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेचा मोह सुटला. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी भाजपचे चांगले लोकप्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपला मतदान करावे,'' असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
Yogi Adityanath
Yogi Adityanath

नाशिक : ''भारतीय जनता पक्षाने सुशासन आणले. सरकारच्या योजना गावागावात नेल्या. मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेचा मोह सुटला. त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी भाजपचे चांगले लोकप्रतिनिधी निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपला मतदान करावे,'' असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

भारतीय जनता पक्ष- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सिडको येथे त्यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर अतिशय शलेक्‍या शब्दांत टिका केली. ते म्हणाले, ''या निवडणुकीत पुन्हा महायुती सत्तेवर येणार आहे. याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. या राज्यात गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगले शासन दिले. त्यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नातील गरीबांसाठी घरे, गॅस यांसारख्या लोककल्याणकारी योजना गावागावात पोहोचल्या. जनतेच्या हितासाठी या सरकारने दिवसरात्र काम केले. त्यामुळे - विकास, सुशासन आणि राष्ट्रवादासाठी भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या.''

ते पुढे म्हणाले, ''काश्‍मीरमध्ये 370 कलम लागू करणे हे कॉंग्रेसचे पाप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाच्या एकतेसाठी कठोर निर्णय घेऊन हे कलम रद्द केले. त्यातून दहशतवादाला पायबंद घातला गेला. या धाडसी निर्णयामुळे धमकीखोर पाकिस्तानला उत्तर मिळाले. त्यानंतर पाकिस्तान चुपचाप बसला आहे. या कलमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विरोध केला होता. आम्ही सगळ्यांचा विचार करुन निर्णय घेतले.'' तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लीम महिलांना हक्क दिल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

''राज्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. नेता, निती आणि नियत नसलेले हे पक्ष आहेत. हे पक्ष परिवारवादी, जातीयवादी राजकारण करतात. देशहिताला हे घाणेरडं राजकारण बाधक आहेत. रावणाने सीतेचे अपहरण केला. तेव्हा सोन्याची लंका पाहून लक्ष्मणाला मोह सुटला. सीतेने लक्ष्मणाला उपदेश देऊन योग्य मार्गावर आनले. तसेच चांगले लोकप्रतिनिधी निवडून देऊन या पक्षांना योग्य मार्गावर आणावे लागेल.'' असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com