मुख्यमंत्री जिंकले, मात्र दोन जागा गमावल्या; बावनकुळेंना नाकारल्याचा फटका ?

मुख्यमंत्री जिंकले, मात्र दोन जागा गमावल्या; बावनकुळेंना नाकारल्याचा फटका ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपला दक्षिण- पश्‍चिमचा गड पुन्हा राखला असला तरी त्यांना दोन सहकारी गमवावे लागले.

नागपूर ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपला दक्षिण- पश्‍चिमचा गड पुन्हा राखला असला तरी त्यांना दोन सहकारी गमवावे लागले.

पश्‍चिम आणि उत्तर नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे येथील दोन्ही उमेदवार बदलण्याची मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

पाच वर्षानंतर पुन्हा शिवसेनेसोबत युती झाली असली तरी भाजपने जिंकलेल्या जागा सोडायच्या नाही असा निर्णय घेतला. शिवसेनेने दक्षिण नागपूरवर दावा सांगतिला होता. मात्र त्यांच्यासाठी एकही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी भाजपने ओढावून घेतली.

सर्वच मतदारसंघांत याचा फटका भाजपला बसल्याचे मताधिक्‍यांवरून दिसून येते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारल्याने तेली व ओबीसी समाजानेसुद्धा मतादनातून आपली नाराजी दर्शवल्याचे स्पष्ट होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com