मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, मंगळवारी निर्णय घेऊ : उदयनराजे 

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

सातारा : महाराज भाजप प्रवेशाचा निर्णय एकदाचा घ्याच. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल, अशी आग्रही मागणी समर्थकांनी केली खरी. त्यावर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी येणार आहे. त्यामुळे मंगळवारी पुन्हा एकदा आपण सर्व एकत्र बसून ठरवू, अशी भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी आज घेतली. 

''राजीनामा दिला तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. मुळात आता झालेल्या निवडणुकीत मताधिक्‍क्‍य कमी झाले. तसा हा पराभवच आहे. त्यामुळे सर्वांनी आत्मपरिक्षण करावे आणि निर्णय घ्यावा. आताच भाजप प्रवेश करावा असे काही नाही. आपण 14 सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे 13 दिवस आहेत," असेही उदयनराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

साताऱ्यातील हॉटेल कल्याण रिसॉर्ट येथे उदयनराजे समर्थकांच्या झालेल्या बैठकीस सुनील काटकर, संदीप शिंदे, रवी साळुंखे, बाळासाहेब गोसावी, संग्राम बर्गे, किशोर शिंदे, सादिकभाई शेख, नाना शिंदे, भरत देशमुख, निशांत पाटील, रंजना रावत, गितांजली कदम, स्मिता घोडके, आदींसह समर्थक उपस्थित होते. बैठकीत अचानक उदयनराजे उपस्थित झाले. त्यावेळी त्यांनी कायकर्त्यांपुढे आपली भुमिका मांडली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com