मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोपीनाथगडावर मराठवाड्यातील खासदारांचा आज सत्कार

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची सोमवारी पाचवी पुण्यतिथी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहतील. मराठवाड्यातील खासदारांचा यावेळी सत्कार होईल.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गोपीनाथगडावर मराठवाड्यातील खासदारांचा आज सत्कार

परळी (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी गोपीनाथ गडावर मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री, खासदार, आमदार अभिवादनासाठी येत आहेत. भाजपा शिवसेना महायुतीच्या मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान यावेळी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
 
परिसरातील गोपीनाथगड येथे कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे. रामराव महाराज ढोक महाराज यांचे सकाळी किर्तन होईल. दुपारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर तसेच अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत. मराठवाड्यातील भाजपा शिवसेना महायुतीच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचाही सत्कारही यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.  

दरम्यान, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने यंदा ग्रामीण भागातील तरूणांसाठी रोजगार मेळावा आयोजित केलाआहे. किमान दहावी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या बीड जिल्हयातील सुमारे पांच हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणा बरोबरच त्यांच्या आवडीचा कोर्स पुर्ण करण्यासाठी एखाद्या नामांकित कंपनीत मानधन तत्वावर जाॅब देऊन कोर्स पुर्ण केला जाणार आहे, त्यासाठी पुण्याची 'यशस्वी ' ही संस्था सहकार्य करणार आहे. कोर्स पुर्ण झाल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला चांगला रोजगार मिळू शकेल अशी व्यवस्था पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com